महाराष्ट्र

चार महिन्याच्या बाळाचे अपहरण करून परराज्यात नेऊन विकले

मुंबई : महानगर मुंबईतील मानखुर्द भागात एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून येथे एका चार महिन्याच्या कोवळ्या बाळाचे अपहरण करून त्याची परराज्यात गुजरातमध्ये विक्री करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी प्रकरणाचा भंडाफोड केला असून तीन महिलांसह चार जणांना अटक केली आहे. या टोळीने अशाच प्रकारे इतर काही मुलांचे अपहरण करून त्यांची अशाच पद्धतीने इतर राज्यांत विक्री केली असावी, असा संशय पोलिसांना आहे. त्यादृष्टीने ते सखोल तपास करत आहेत.
मानखूर्द भागातील एका महिलेच्या अवघ्या चार महिन्यांच्या मुलीचे काही दिवसांपूर्वी अचानक अपहरण झाले.मुलगी घरातून अचानक गायब झाल्याने ती महिला हवालदिल झाली. तिने आजूबाजूला विचारणा केली. पण कुणीच त्या मुलीला पाहिले नव्हते. अखेर हताश होऊन तिने पोलिस ठाणे गाठून मुलीचे अपहरण झाल्याची तक्रार दिली. महिलेने तिच्याच परिसरात राहणार्‍या शर्मिन आणि सिद्धिकी खान यांच्यावरसंशय व्यक्त केला. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी सुरू केल्यानंतर सुरुवातीला इन्कार करणारे हे जोडपे नंतर हडबडबले.त्यांनी मुलीला पळवून नेल्याची कबुली दिली.या जोडप्याने महिलेला फरजाना शेखया महिलेकडे दिले. तिने मुलीला माटुंबा भागातील ज्युलिया फर्नांडिस हिला विकले होते.पोलिसांनी या दोघींची कसून चौकशी केल्यावर त्यात गुजरातमधील महिला डॉक्टर माया इंबाळे हिला विकले होते. गंभीर बाब म्हणजे त्या डॉक्टरने मुलीला बंगळुरू येथे पाठवले होते. ही सगळी साखळी जुळवून आरोपींच्या मुसक्या आवळून पोलिसांनी घटनेचा उलगडा केला व चार महिन्यांची चिमुकली ताब्यात घेऊन तिला मातेच्या दिले. या टोळीने याआधी अशाप्रकारे किती मुलांचे अपहरण केले.त्यासाठी त्यांना किती पैसे मिळाले याचा शोध पोलीस घेत आहेत.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: