क्राईम डायरी

चिखलीत घरासमोरच तिने सुरू केला ‘तो’ धंदा!

चिखली (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः दिवसाढवळ्या घरासमोर बसून हातभट्टी दारू विकणाऱ्या महिलेला चिखली पोलिसांनी पकडले. तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.ही कारवाई आज, 27 मार्चला सकाळी 9:30 च्या सुमारास करण्यात आली.
जैनबबीद महेबुब पप्पूवाले (38, रा. गवळीपुरा चिखली) ही महिला हातभट्टी दारू विकत असल्याची माहिती पोलिसांना खबऱ्याकडून मिळाली होती.त्‍यांनी तिच्‍या घराकडे जाऊन पाहणी केली ती घरासमोरच रोडवर हातात प्लस्टिकची कॅन घेऊन दारू विकताना दिसली. महिला पोलीस कर्मचारी अनिता आराख यांनी कॅन ताब्यात घेत दारू जप्त केली.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: