क्राईम डायरी

चिखलीत जुगार अड्ड्यावर ‘एलसीबी’चा छापा; चौघांना पकडले

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः चिखली शहरातील भीमनगर परिसरात अवैधरित्या सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर बुलडाणा स्थानिक गुन्हे शाखेने छापा मारून 4 जुगाऱ्यांना ताब्यात घेतले. त्‍यांच्‍याकडून 55120 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ही कारवाई काल, 1 एप्रिलला सायंकाळी करण्यात आली.

नीलेश जाधव यांच्या शेताच्या काठावर जुगार सुरू असल्याची माहिती ‘एलसीबी’ला खबऱ्याकडून मिळाली होती. माहितीच्या आधारे गुन्हे शाखेने छापा मारला. या ठिकाणी राम तोतराम सवडतकार (27, रा. गजानननगर, चिखली), शेख इमरान शेख युसूफ (30, रा. कॉटन मार्केटजवळ चिखली), मोहम्‍मद समीर मोहम्‍मद अजीज (26, रा. आनंदनगर चिखली), शेख समीर शेख मेहबूब (24, रा. नगरपालिकेजवळ चिखली) अशी पकडण्यात आलेल्या जुगारींची नावे आहेत. त्यांच्याकडून नगदी 12870 व जुगार साहित्य 42250 रुपयांचे असा एकूण 55120 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई कर्तव्यदक्ष जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया, अप्पर पोलीस अधीक्षक बजरंग बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘एलसीबी’चे पोलीस निरीक्षक बळीराम गीते यांच्या आदेशाने पोलीस उपनिरीक्षक नीलेश शेळके, श्रीकांत जिंदमवार, पोहेकाँ श्रीकृष्ण चांदूरकर, पो.ना. राजेंद्र क्षीरसागर, पो.काँ. भारत जंगले, पो.काँ. प्रवीण पडोळ, पो.काँ.गजानन गोरले, पो. काँ. संदीप मोरे, पो.काँ.सुभाष वाघमारे, पो.काँ. सुधाकर बोर्डे यांनी पार पाडली.

शेगावमध्ये रस्‍त्‍यावरच सुरू होता त्‍यांचा तो धंदा; पोलिसांना पाहून बाकी पळाले, दोघे हाती लागले…!

शेगाव (ज्ञानेश्वर ताकोते ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः रस्‍त्‍यावरच जुगाराचा धंदा मांडणाऱ्या दोघांच्‍या मुसक्‍या शेगाव शहर पोलिसांनी काल, 1 एप्रिलला संध्याकाळी आवळल्‍या. आठवडे बाजारात हे दोघे वरली मटका जुगार पैशांच्‍या हारजीतवर खेळत व खेळवत होते. शिवाजी लक्ष्मण कासुर्डे (27, रा. बुरुंगले प्‍लॉट शेगाव), विठ्ठल जगदेव डोंगे (49, रा. भुतबंगला परिसर, शेगाव) अशी पकडण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. शेगाव शहरात पेट्रोलिंग करताना पो. ना. गणेश वाकेकर आणि त्‍यांच्‍या सहकाऱ्यांना आठवडे बाजारात जुगार खेळवला जात असल्याची माहिती मिळाली. रोडवरच आडोशाला बसून काही जण जुगार खेळत व खेळवत होते. पंचांना जमा करून पोलिसांनी तिथे छापा मारला. तेव्‍हा दोघे हाती लागले. त्‍यातील शिवाजी कासुडेच्‍या ताब्‍यातून जुगाराच्‍या साहित्‍यासह 1425 रुपयांचा मुद्देमाल तर विठ्ठल डोंगेच्‍या ताब्‍यातून 845 रुपयांचा मुद्देमाल जप्‍त करण्यात आला.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: