बुलडाणा (घाटावर)

चिखलीत तूर खरेदीस प्रारंभ

चिखली (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः चिखली येथे 24 जानेवारीला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात किमान आधारभूत किंमतीने शेतकर्‍यांची तूर खरेदी सुरू करण्यात आली. यावेळी आमदार सौ. श्‍वेताताई महाले यांनी काटा व चाळणीचे पूजन करून तूर खरेदीस प्रारंभ करण्यात आला.
यावेळी पंचायत समितीच्या सभापती सौ. सिंधुताई तायडे, पंचायत समितीच्या उपसभापती शमशाद पटेल, जिल्हा परिषद सदस्या सौ. सुनंदाताई शिनगारे, जिल्हा परिषद सदस्या सौ. शैलाताई पठाडे, सौ. सुरेखाताई गवई , भाजप शहराध्यक्ष पंडितदादा देशमुख, तालुकाध्यक्ष डॉ. कृष्णकुमार सपकाळ, बाजार समिती संचालक गजाननराव पवार, सचिव श्री. शेटे, शेतकरी शिवाजीराव खंडागळे बोरगाव काकडे, रमेश उत्तम गिरी व अहिल्याबाई सहकारी संस्थेचे अध्यक्ष प्रविण हटकर, सर्व हमाल कामगार बांधव, कर्मचारी वर्ग व शेतकरी उपस्थित होते.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: