बुलडाणा (घाटावर)मुख्य बातम्या

चिखलीत “स्वाभिमानी’च्‍या कार्यकर्त्यांची “विरुगिरी’; न.प.च्या गैरव्यवहाराविरोधात चढले मोबाइल टॉवरवर

चिखली (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः भारतीय जनता पक्षाची सत्ता असलेल्या चिखली नगरपरिषदेत करोडो रुपयांचा गैरव्यवहार झाला आहे. अर्धवट कामांची पूर्ण बिले काढण्यात आली. या गैरव्यवहाराला कारणीभूत मुख्याधिकाऱ्यांना तत्काळ निलंबित करा. अर्धवट झालेल्या विकासकामांचा पंचनामा करा या मागण्यांसाठी आज, २१ जूनला सकाळी अकराच्‍या सुमारास स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते चिखली येथील गांधीनगरातील मोबाइल टॉवरवर चढले आहेत. जोपर्यंत मुख्याधिकाऱ्यांचे निलंबन होऊन चौकशीला सुरुवात होत नाही तोपर्यंत टॉवरवरून उतरणार नाही, अशी भूमिका स्वाभिमानी या कार्यकर्त्यांनी घेतल्याने प्रशासनाची पळापळ सुरू झाली आहे. दुपारपर्यंत हे कार्यकर्ते टॉवरवरून उतरले नव्‍हते.

नितीन राजपूत, मयूर बोर्डे, विनायक सरनाईक, भगवानराव मोरे, शुभम पाटील, रामेश्वर परिहार, संतोष दहिकर, अनिल चौहान, शाहीर बापू लंबे, कार्तिक खेडेकर अशी आंदोलकांची नावे आहेत. चिखली नगर परिषदेने 2016 ते 2021 दरम्यान वैशिष्ट्यपूर्ण निधी योजनेअंतर्गत केलेल्या अर्धवट कामांची कोट्यवधी रुपयांची बिले काढली. संभाजीनगरातील श्री संत सेना भवन व चिखली शहरातील इतर 10 ते 12 भूखंडांच्या सौंदर्यीकरणाचे कामही अर्धवट करून त्याची पूर्ण बिले काढली. याप्रकरणाची तक्रार स्वाभिमानी शेतकरी संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांकडे व प्रशासनाकडे वारंवार केली होती.मा त्र तक्रारीची दखल घेण्यात न आल्याने नाईलाजास्तव हे जीवघेणे पाऊल उचलल्याचे मयूर बोर्डे यांनी सांगितले.

Related Articles

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
Close
%d bloggers like this: