क्राईम डायरी

चिखली ः धोत्रा नाईक येथे एकाची आत्महत्या

अमडापूर (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः 40 वर्षीय व्यक्तीने शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना 30 जानेवारीला सकाळी 9 वाजता धोत्रा नाईक (ता. चिखली) शिवारात घडली. देवानंद प्रल्हाद पवार (रा. धोत्रा नाईक) असे आत्महत्या करणार्‍या शेतकर्‍याचे नाव आहे. त्यांनी चुलत काकाच्या शेतात जाऊन आत्महत्या केली. अमडापूर पोलीस ठाण्यात घटनेची माहिती देताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठवला. पोहेकाँ शांता मगर, श्री. राठोड यांनी पंचनामा केला. आत्महत्येचे कारण 1 फेब्रुवारीच्या सकाळपर्यंत समोर येऊ शकले नव्हते.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: