बुलडाणा (घाटावर)मुख्य बातम्या

चिखली, अंचरवाडी, डोढ्रामध्ये आढळले कोरोना रुग्‍ण!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात आज, 29 जुलैला कोरोनाचे तीन नवे रुग्‍ण समोर आले असून, चार जणांना बरे झाल्याने रुग्‍णालयातून सुटी देण्यात आली आहे. सध्या रुग्‍णालयांत 22 रुग्‍ण उपचार घेत आहेत.

प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 2123 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 2120 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून, 3 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालामध्ये रॅपीड टेस्टमधील 3 अहवालांचा समावेश आहे. निगेटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतून 499 तर रॅपिड टेस्टमधील 1621 अहवालांचा समावेश आहे.

पॉझिटिव्‍ह आलेले अहवाल
चिखली तालुका : अंचरवाडी 1, चिखली शहर : 1, देऊळगाव राजा तालुका : डोढ्रा 1

एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 87250 वर
आजपर्यंत 635882 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 86556 कोरोनाबाधित रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. आज रोजी 1527 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 87250 कोरोनाबाधित रुग्ण असून, सद्यःस्थितीत कोविडचे 22 सक्रीय रुग्ण उपचार घेत आहेत. आजपर्यंत 672 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

Related Articles

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
Close
%d bloggers like this: