बुलडाणा (घाटावर)मुख्य बातम्या

चिखली ठरतेय कोरोनाचा हॉट स्पॉट!; अवघ्या 10 दिवसांतच 336 पॉझिटिव्ह!!

शहरासह ग्रामीण मध्येही उद्रेक
बुलडाणा ( संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः मागील वर्षीच्या मध्यावर अचानक रुग्ण संख्या वाढलेल्या परंतु जानेवारीपर्यंत सुरक्षित असलेल्या चिखली शहरासह तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून, हा तालुका हॉट स्पॉट बनण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे की काय, अशी भीती व्यक्त होत आहे.

फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात तालुक्यात कोरोनाचा गंभीर उद्रेक झाल्याचे चित्र आहे. फेब्रुवारीच्या प्रारंभी याची चुणूक दिसून आली. तो कोरोनाच्या कमबॅक चा इशारा होता. 11 ते 20 फेब्रुवारी या दरम्यान म्हणजे जेमतेम 10 दिवसांतच तालुक्यात तब्बल 336 रुग्ण आढळून आले आहे. याची सरासरी लक्षात घेतली तर दिवसाकाठी 33 रुग्ण या वेगाने रुग्ण वाढत असल्याचे गंभीर चित्र आहे. या मुदतीत चिखली शहरात 217 तर ग्रामीण भागात 119 कोरोना रुग्ण आढळले आहेत. चिखलीनगरीतील हा फैलाव चिंता वाढवणारा आहे. 17 फेब्रुवारीला शहरात सर्वाधिक 32 रुग्ण निघाले. 20 तारखेला 23 रुग्ण, 19 तारखेला 27 , 18 तारखेला 30, 15 तारखेला 23, 14 तारखेला 27, 13 तारखेला 14 पॉझिटिव्ह, 12 तारखेला 18 तर 11 तारखेला 12 रुग्णांची नोंद झाली. यामुळे 16 फेब्रुवारीला आलेला 11 तर 13 ला आलेला 14 रुग्णांचा आकडा कमी वाटायला लागला असे भीषण चित्र आहे.
खेडोपाडी कोरोना…

कोरोना चिखली तालुक्यातील खेडोपाड्यांत पोहोचलाय! यामुळे या 10 दिवसांतच ग्रामीणमधील रुग्ण संख्येने 119 चा आकडा गाठला आहे. मेरा बुद्रुक ते अमडापूर ते किन्होळा केळवद ते अंचरवाडी, पेनसावंगी अशी कोरोनाने मजल मारली आहे. ही यादी यावरच थांबली नसून कोरोनाने खंडाळा मकरध्वज, सवना, दहिगाव, भालगाव, करवंड, भरोसा, मंगरूळ नवघरे, गजरखेड, पिंपळवाडी, अंतरी कोळी, अंतरी, धोत्रा भणगोजी, तेल्हारा, सावरगाव डुकरे, सावरखेड, हातनी, गोद्री, खैरव, पळसखेड, जांभोरा, पिंपळगाव सोनारा, पाटोदा, टाकरखेड हेलगा, देऊळगाव घुबे, वळती, शिरपूर, कवठळ, गोरेगावपर्यंत कोरोनाचा शिरकाव झालाय! यामुळे तालुक्यातील कोरोनाचा उद्रेक किती धोकादायक आहे हे स्पष्ट होते.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: