जिल्ह्याचं राजकारणबुलडाणा (घाटावर)मुख्य बातम्या

चिखली तालुक्यातील 18 गावांचे कारभारी निवडले; 2 जागा रिक्त; वाचा कोण कुठं झालं सरपंच, उपसरपंच…

चिखली (कृष्णा सपकाळ ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः तालुक्यातील 20 गावांच्या सरपंच, उपसरपंचाची निवड आज, 9 फेब्रुवारीला शांततेत पार पडली. तालुक्यातील 18 गावांचे सरपंच निवडण्यात आले तर वैरागड आणि दिवठाणा येथे आरक्षित प्रवर्गाचा उमेदवार नसल्याने तेथील सरपंच पद रिक्त ठेवण्यात आले.
शेलसूर येथे सरपंच विजय सखाराम धंदर, उपसरपंच सुनील भगवान धुंदळे, साकेगाव सरपंच उर्मिला विरोधभाई पवार तर उपसरपंच देविदास नामदेव लोखंडे, ब्रह्मपुरी प्रभाकर किसन भुतेकर तर उपसरपंच लता सतिश वानखेडे, किन्होळा सरपंच अर्चना वसंता जाधव, उपसरपंच कल्पना अनिलसिंग राजपूत, हरणी सरपंच मिताली संतोष साळवे, उपसरपंच संगीता शिवलाल चव्हाण, उत्रदा सरपंच सिंधू रमेश इंगळे, उपसरपंच नवलसिंग बिदेसिंग इंगळे, धोत्रा भणगोजी सरपंच गुलाबसिंग रामसिंग सोनारे, उपसरपंच प्रसाद संभाजी काळे, टाकरखेड मु. येथे सरपंच लक्ष्मी भागवत खेन्ते तर उपसरपंच तेजराव लक्ष्मण गायकवाड, वैरागड येथे सरपंचपद रिक्त तर उपसरपंचपदी गजानन वसंता बनकर, एकलारा येथे सरपंच छाया गजानन अंभोरे तर उपसरपंच मालता विजय लंके, दिवठाणा येथे सरपंच पद रिक्त तर उपसरपंच अनंता मोरे, सोमठाणा येथे सरपंच गीता विजय परिहार तर उपसरपंच विठ्ठल बापूराव झगरे, खोर येथे सरपंच पूनम दीपक हाके तर उपसरपंच राहुल सुद्धार्थ सावळे, धोत्रा नाईक येथे सरपंच दीपाली भीमसेन सरसंडे तर उपसरपंच सुमित्रा राजू शेळके, माळशेंबा येथे सरपंच सुमन फकिरबा खोसरे तर उपसरपंच वसंत गणपत जाधव, अमडापूर येथे सरपंच वैशाली संजय गवई तर उपसरपंच अजीज खाँ बाबा खाँ, तोरणवाडा येथे सरपंच कविता संघपाल गवई तर उपसरपंच शीला राजेंद्र कळसुंदर, इसोली येथे सरपंच सुनील अर्जुन शेळके तर उपसरपंच प्रकाश उद्धव लाघे, शेलोडी येथे सरपंच समाधान भिकाजी रिठे तर उपसरपंच चंद्रकला पांडुरंग नेमाने, करवंड येथे सरपंच सपना काशिनाथ मोरे तर उपसरपंच ज्योती उत्तम राठोड यांची निवड झाली. उद्या 20 आणि परवा 20 गावांचे सरपंच, उपसरपंच निवडण्यात येणार आहेत.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: