बुलडाणा (घाटावर)मुख्य बातम्या

चिखली तालुक्‍यातील शेवडीत आढळला कोरोना रुग्‍ण!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात आज, 27 ऑगस्‍टला कोरोनाचा एक पॉझिटिव्‍ह रुग्‍ण समोर आला असून, तो चिखली तालुक्‍यात शेवडीत आढळला आहे. पाच रुग्‍ण बरे झाल्याने त्‍यांना रुग्‍णालयातून डिस्‍चार्ज देण्यात आला आहे. सध्या रुग्‍णालयांत 20 रुग्‍ण उपचार घेत आहेत.

प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 1672 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 1671 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून एक अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाला आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील एका अहवालाचा समावेश आहे. निगेटिव्ह अहवालामध्ये प्रयोगशाळेतील 205 तर रॅपिड टेस्टमधील 1466 अहवालांचा समावेश आहे.

आजपर्यंत 685425 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 86691 कोरोनाबाधित रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. आज रोजी 1450 नमुने कोविड निदानासाठी घेण्यात आले आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 87383 कोरोनाबाधित रुग्ण असून, आजपर्यंत 672 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

Related Articles

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
Close
%d bloggers like this: