क्राईम डायरी

चितोडा प्रकरण : हिवराळे गटातील आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः चितोडा (अंबिकापूर) (ता. खामगाव) येथील वाघ-हिवराळे कुटुंबातील मारहाण प्रकरणी खासदार प्रतापराव जाधव आक्रमक झाल्यानंतर तीन आरोपींना काल, 28 जूनला सायंकाळी पोलिसांनी अटक केली होती. आज तिघांना खामगाव न्यायालयात हजर केले असता 1 जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

चितोडा येथे 19 जूनला वाघ आणि हिवराळे गटात हाणामारी झाली होती. वाघ गटाविरद्ध गुन्हे दाखल करून अटकही करण्यात आली होती. मात्र हिवराळे गटातील कुणालाही अटक नसल्याने खासदार जाधव यांनी चितोड्यात येऊन संताप व्यक्त केला होता. पत्रपरिषद घेऊन त्यांनी थेट ठाणेदारांना व बिट जमादाराला निलंबित करण्याची मागणी केली होती. त्यानंतर लगेच उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल कोळी यांनी सूत्रे हलवत नीतेश हिवराळे, बाळू हिवराळे, योगेश हिवराळे यांना काल सायंकाळी चितोडा शेतशिवारातून अटक केली होती. आज तिघांना न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणात हिवराळे गटातील आणखी काहींना अटक होण्याची शक्यता आहे.

Related Articles

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
Close
%d bloggers like this: