क्राईम डायरीमुख्य बातम्या

चोरट्यांची पोलिसांवरही “वक्रदृष्टी’!; पोलीस दाम्‍पत्‍याची स्‍कूटी लोणारमधून लांबवली!!

लोणार (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत मोटारसायकल चोरीचे सुरू आहे. रोज दोन-तीन मोटारसायकली गायब होत आहेत. लोणारमध्ये तर चक्‍क पोलीस दाम्‍पत्‍यालाच चोरट्याने हिसका दाखवला. या दाम्‍पत्‍याची स्‍कूटी चोरीस गेली असून, त्‍यावरून चोरट्याविरुद्ध गुन्‍हा दाखल करण्यात आला आहे.

राजकुमार अर्जुन कंकाळ (रा. रामनगर, लोणार) हे लोणार पोलीस ठाण्यात पाच वर्षांपासून कार्यरत आहेत. त्‍यांची पत्नीसुध्दा याच पोलीस ठाण्यात कार्यरत आहे. पत्‍नीच्‍या नावावर त्‍यांनी २०१९ मध्ये ज्‍युपिटर स्‍कूटी विकत घेतली होती. सध्या त्‍यांची पत्नी बालसंगोपन रजेवर माहेरी गेली आहे. त्‍यामुळे स्‍कूटी राजकुमार कंकाळ हेच वापरत होते. २२ जुलैच्‍या रात्री ते रामनगरमधील घरी परतले. स्‍कूटी बाहेर उभी करून झोपले. काल, २३ जुलैला सकाळी उठले असता स्‍कूटी गायब होती. आजूबाजूला व परिसरात शोध घेऊनही स्‍कूटी दिसून आली नाही. ती चोरीस गेल्याचे लक्षात आल्याने कंकाळ यांनी चोरट्याविरुद्ध तक्रार नोंदवली. तपास बीट अंमलदार पोहेकाँ रामकिसन गिते करत आहेत.

Related Articles

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
Close
%d bloggers like this: