बुलडाणा (घाटावर)मुख्य बातम्या

छोटा कार्यक्रम, मोठा बंदोबस्त!, सर्व अधिकाऱ्यांची कोरोना चाचणी!!, मुख्यमंत्र्यांचा धावता हवाई दौरा

बुलडाणा ( संजय मोहिते) : जेमतेम अडीच तीन तासांचा कार्यक्रम , महासुरक्षा बंदोबस्त व नजीक राहणाऱ्या अधिकारी ,कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी बंधनकारक असा मुख्यमंत्री व पर्यटन मंत्री यांच्या 5 फेब्रुवारीच्या दौऱ्याचा ढंग राहणार आहे. यामुळे राजेशाही थाटात मध्यान्ही झोपेतुन उठणाऱ्यांना तर सीएम कधी आले अन कधी गेले हे देखील समजणार नाहीये. एवढेच काय जाहीर सभा नसल्याने जागी असलेल्यांना सुद्धा केवळ आकाशात भिरभिरणाऱ्या हेलिकॉप्टरच्या आवाजामुळे त्यांचे आगमन व परतणे समजणार आहे. इतका हा छोटेखानी दौरा आहे.
मात्र दौरा छोटा असला तरी सुरक्षा व्यवस्था मोठी आहे. पोलीस अधीक्षक अरविंद चावरीया यांच्या मार्गदर्शनात 3 उप अधीक्षक, 12 पोलीस निरीक्षक, 40 पोलीस उप निरीक्षक,318 कर्मचारी यांच्याशिवाय गुप्तचर यंत्रणांची पाहणी क्षेत्रात करडी नजर राहणार आहे.
दरम्यान मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षा ताफ्यातील सर्व अधिकारी, कर्मचारी, आढावा बैठकीत उपस्थित राहणारे अधिकारी, कर्मचारी, व्हीआयपी यांची कोरोना चाचणी बंधनकारक आहे. पोलीस ठाण्याच्या आवारात ठाणेदारांसह पोलिसांची rtpcr कोरोना चाचणी करण्यात आली,

  • संभाव्य दौरा
    दरम्यान लघु दौरा असल्याने व सुरक्षेच्या कारणावरून तपशीलवार दौऱ्याची प्रसिद्धी करण्यात आली नाही, मात्र दौऱ्याशी थेट संबंध असणाऱ्या अधिकाऱ्यांनी ( अर्थात नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर) बुलडाणा लाईव्हला दिलेल्या माहितीनुसार सीएम व पर्यटन मंत्री विमानाने औरंगाबाद येथे पोहोचणार आहे. यानंतर ते हेलिकॉप्टरने सकाळी 9.30 वाजता लोणारमध्ये दाखल होतील, यानंतर मोटारीने वनविभागाच्या वनकुटी परिसरात पोहोचून सरोवरची , नंतर धारातीर्थची पाहणी करतील. यापाठोपाठ सव्वा दहाच्या सुमारास एमटीडीसी विश्रामगृहात ते विविध विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत लोणार सरोवर संवर्धन, विकासकामे संदर्भात बैठक घेतील. यावेळी त्यांचे समक्ष आराखड्याचे सादरीकरण सुद्धा करण्यात येणार असल्याचे या उच्च पदस्थ सूत्रांनी स्पष्ट केले.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: