क्राईम डायरीमुख्य बातम्या

जंगलांना आगी लावणारा नराधम सापडला..!; उंद्रीजवळ शेतातून आवळल्‍या मुसक्‍या!!

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः जिल्ह्याचे वनवैभव असणाऱ्या ज्ञानगंगा अभयारण्यात शिकार करण्यासाठी सूडबुद्धीने  शेकडो हेक्टर जंगलांना आगी लावणाऱ्या माथेफिरूस वन्यजीव विभागाच्या पथकाने शिताफीने एका शेतातून जेरबंद केले. शिकारीच्या साहित्यासह पकडण्यात आलेल्या या आरोपीचे अन्य साथीदार आहेत का, याचाही आता तपास करण्यात येत आहे.

महेबूब खान समशेर खान पठाण ( ४२, रा, उंद्री ता. चिखली) असे या अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. ज्ञानगंगा अभयारण्यातील माटरगाव व हरणी बिटमधील शेकडो हेक्टर जंगलाना आग लावायची. त्यातील वन्यजीवांची शिकार साधून पोबारा करायचा धडाका त्याने लावला होता. यामुळे वाइल्ड लाईफचे अधिकारी, कर्मचारी त्रस्त झाले होते. मात्र गुन्हेगार स्वतःला कितीही चलाख असला तरी त्याच्या पापाचा घडा भरतोच या धर्तीवर वन्यजीवच्या पथकाने त्याच्या मुसक्या आवळण्यात यश मिळवले. महेबूब याला उंद्री शिवारातील एका शेतातून जेरबंद करण्यात आले. त्याच्‍या जवळून आग लावण्याचे व शिकारीचे साहित्य जप्त करण्यात आले. त्याच्‍या विरुद्ध वन्यजीव संरक्षण अधिनियम 1971 चे विविध कलमानुसार गुन्हे दाखल करण्यात आले. विभागीय वनाधिकारी मनोजकुमार खैरनार, सहाय्यक वनसंरक्षक व्ही. जी. साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली आरएफओ मयूर सुरवसे, वनपाल श्री. नेवरे, नितेश गवई, राजेंद्र सूर्यवंशी, मुक्ता ताठे आदींनी ही कारवाई केली.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: