बुलडाणा (घाटावर)

जय भोले… गोमेधर ते लखनवाडा पायदळ वारीने दुमदुमला परिसर!; मेहकर तालुक्‍यातील २५ वर्षांची परंपरा

मेहकर (अनिल मंजुळकर ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जय भोलेच्या गजरात जय नागेश्वर कावड मंडळाच्या सदस्यांनी गोमेधर ते लखनवाडा पायदळ वारी करून परिसर दुमदुमून टाकला. सकाळी गौतमेश्वर संस्थान येथून पाचला पायदळ वारी सुरू केली. इसाई माता संस्थान देऊळगाव साकर्शा येथे जेवणाची व्यवस्था गोपाल आमले यांनी केली होती. या ठिकाणी महादेवाची भजन गाण्यात आली.

इसाई माता संस्थानचे महंत रामदास महाराज यांनी मंडळाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर बोचरे यांचा सत्कार केला. सरपंच संदीप अल्हाट व ग्रामपंचायत सदस्य बाळू वानखेडे यांनीही शाल श्रीफळ देऊन सत्कार केला. सुरुवातीला 5 सदस्य यांच्यापासून कावड यात्रेला सुरुवात आता हा आकडा १०० जणांवर गेला आहे. आज या वारीला २५ वर्षे पूर्ण झाली. वारीत ज्ञानेश्वर बोचरे, सुरेश सूर्यवंशी, कैलास पांढरे, अक्षय पांढरे, रामा पाटील, विजय पांढरे, संतोष सूर्यवंशी, गजानन महाराज भोले (पुजारी), नवल रामदास पांढरे, सीताराम इंगळे, शिवाजी इंगळे, गोटू भोलणकर, लक्ष्मण आदींचा सहभाग होता. कृष्णा चव्हाण, सुधाकर गायकवाड, बबन चव्हाण, रंजीतबापू देशमुख, रामचंद्र चव्हाण, रमेश काळे, मनोज देशमुख, संतोष बोरचाटे, राजू गायकवाड आदींची उपस्‍थिती होती.

Related Articles

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
Close
%d bloggers like this: