खामगाव (घाटाखाली)

जळगाव जामोद ः माळी समाजाचे उपवधू-वर परिचय संमेलन उत्साहात

जळगाव जामोद (गणेश भड ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः  जळगाव जामोद व संग्रामपूर तालुका माळी समाज, महात्मा फुले मंडळातर्फे 32 वे उपवर-वधू परिचय संमेलन तथा महिला शिक्षण दिवस 3 जानेवारी रोजी उमादेवी सांस्कृतिक सभागृह, कृषी विज्ञान केंद्र, जळगाव (जामोद) येथे पार पडला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार कृष्णराव इंगळे होते. डॉ. सौ. स्वातीताई वाकेकर (अध्यक्ष,महासिद्ध अर्बन), प्रा. भाऊसाहेब इंगळे, डॉ. एस. एन. भोपळे, रामदास वाकेकर, वासुदेवराव भोपळे, डॉ. प्रकाश ढोकणे, भीमराव राऊत, प्रविण भोपळे, कृष्णा महाजन, लक्ष्मण महाजन, प्रभाकर चौधरी, अविनाश उमरकर, वसंत चौधरी, हरिभाऊ राजनकर, त्र्यंबकराव घाटे, सौ. द्वारकाबाई राजनकार, अभिमन्यू राखोंडे, पांडुरंग वेरुळकार, मारोती वानखडे, गोपाल इंगळे, सुनिल तायडे, विश्‍वंभर वावगे, मुकुंद दाते, मोहन वानखडे व इतर मान्यवर उपस्थित होते. संमेलनात 611 युवक व 530 युवतींनी नावाची नोंदणी केली.      कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. सौ.स्वातीताई वाकेकर यांनी  केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नितीन सातव, महादेवराव घुटे, शालिग्राम भोपळे, डॉ. संदीप वाकेकर, ज्ञानदेव राजनकार, मोहन पान्हेरकार, डॉ. राखोंडे, गणेश खिरोडकर, पांडुरंग भोपळे, रामकृष्ण खिरोडकर, शालिग्राम भोपळे, श्रीकृष्ण वानखडे, प्रभूदास बंबटकार, कैलास घुटे, संतोष देउकर, संतोष वानखडे, अनिल इंगळे, अरुण वानखडे, दिपक उमाळे, विशाल सातव, मधुकर वानखडे, संजय घाटे, अनिल जाधव, सुधाकर जाधव, पंकज तायडे,  वसंत वानखडे, राजीव घुटे, श्रीकांत वानखडे, अजय ताठे, अतुल उमाळे, आकाश उमाळे यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन सुपडा इंगळे व सौ. दीपालीताई इंगळे यांनी केले. आभार प्रदर्शन मारोती वानखडे यांनी केले.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: