क्राईम डायरी

जांभरून शिवारातून चोरल्या 70 गावरान कोंबड्या!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात कोरोना संकट गडद होत असताना बर्ड फ्‍लूचे सावटही कायम आहे. यामुळे सामान्य नागरिक, शेतकऱ्यांचे जीव हैराण केले असताना दुसरीकडे चोरट्यांनीही उच्‍छाद मांडला आहे. बुलडाणा शहराजवळील एका पोल्ट्री फार्ममधून 70 गावरान कोंबड्या व शेतीउपयोगी साहित्य लंपास करण्यात केल्याची घटना जांभरून शिवारात काल, 27 फेब्रुवारीला सकाळी समोर आली.
विजय बोर्डे यांनी शेतात गावरान कोंबड्यांचे पोल्ट्री फार्म सुरू केले आहे. काल सकाळी ते शेतात गेले असता त्यांना त्यांच्या पोल्ट्री फार्मची जाळी तुटलेली दिसली. पोल्ट्री फार्म मधील 70 गावरान कोंबड्या व शेतातील काही साहित्य चोरी गेल्याचे कळाले. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली असून, पोलिसांनी चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: