बुलडाणा (घाटावर)मुख्य बातम्या

जानेफळच्‍या पशूवैद्यकीय दवाखान्याच्‍या कपाऊंडमध्ये कंडोमची रिकामी पाकिटे!; अधिकाऱ्यांची पोलिसांत धाव

मेहकर (अनिल मंजूळकर ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा)ः जानेफळचा पशूवैद्यकीय दवाखाना मद्यपींचा अड्डा बनला आहे. दारू पिऊन दवाखान्याच्‍या कपाऊंडच्‍या आत बाटल्‍या, प्‍लास्‍टिकचे ग्‍लास, रिकामे पाऊच फेकले जातात. कंडोमची रिकामी पाकिटेही या ठिकाणी आढळून येतात. त्‍यामुळे अनैतिक, अवैध धंदे या परिसरात तर सुरू नाहीत ना याबद्दल शंका घेत पशुधन विकास अधिकाऱ्यांनी जानेफळ पोलिसांत तक्रार केली आहे. त्‍यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

तक्रारीत अधिकाऱ्यांनी म्‍हटले आहे, की सध्या कोरोना महामारीमुळे परिसरात स्वच्‍छता राखणे अत्‍यंत गरजेचे आहे. मात्र दवाखान्याच्‍या परिसरात मद्यपी अस्वच्‍छता पसरवत आहेत. याचा त्रास पशुपालक शेतकरी व आम्‍हाला होत आहे. मद्यपींना वारंवार सांगूनही कोणताही फरक पडलेला नाही, असेही त्‍यांनी तक्रारीत म्‍हटले आहे. या तक्रारीची प्रत जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी आणि ग्रामपंचायतीलाही देण्यात आली आहे.

Related Articles

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
Close
%d bloggers like this: