बुलडाणा (घाटावर)मुख्य बातम्या

जिजाऊ जन्मोत्सवासाठी सजली सिंदखेड राजा नगरी!; पूर्वसंध्येला मशाल यात्रा काढून जन्मस्थळी पूजन

सिंदखेड राजा (बाळासाहेब भोसले ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री राष्ट्रमाता जिजाऊ यांचा जन्मोत्सव सोहळा आज, 12 जानेवारीला होत आहे. सोहळ्यासाठी राजे लखुजीराव जाधव यांचा राजवाडा जिजाऊ जन्मस्थळावर आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे.

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर यावर्षी जिजाऊ जन्मोत्सवानिमिताने कलम 144 लागू केले असून, गर्दी करण्यास मनाई केली असल्यामुळे मराठा सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष पुरुषोतम खेडेकर यांनी आपापल्या घरीच जिजाऊ पूजन करून जन्मोत्सव सोहळा साजरा करण्याचे आवाहन केले आहे. जन्मोत्सव सोहळ्याच्या पूर्वसंध्येला शहरातील महिलांनी मशाल यात्रा काढून जिजाऊंच्या जन्मस्थळी पूजन केले. यावेळी पुरातत्व विभाग व नगर परिषदेतर्फे आकर्षक रोषणाई करून जिजाऊ नगरी जन्मोत्सव सोहळ्यासाठी सजली आहे.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: