महाराष्ट्र

जिना मरना तेरे संग… प्रेमीयुगुलाने घेतला गळफास!; चंद्रपूर जिल्ह्यातील घटना

चंद्रपूर : घरच्‍यांचा असलेला विरोध लक्षात घेता ते प्रेम कधीच मान्य करणार नाहीत हे लक्षात आल्यावर पळून गेलेल्या प्रेमीयुगुलाने गळफास घेऊन आयुष्य संपवले. ही घटना चंद्रपूर तालुक्यातील पिंपळझोरा येथे समाेर आली. वनरक्षकाला गस्‍त घालताना त्‍यांचे मृतदेह दिसले होते.

बेवारस दुचाकीही त्‍यांचीच असल्याची खात्री नंतर पटली. राजू होमदेव आत्राम व सलोनी मडावी अशी या युगुलाची नावं. आष्टी पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या चामोर्शी तालुक्यातील रमणगट्टा येथील राजू (२२) व सलोनी (१८) एकमेकांच्‍या आकंठ प्रेमात बुडाले होते. काही महिन्यांपूर्वीही ते पळाले होते. मात्र सलोनी त्‍यावेळी अल्पवयीन होती. त्‍यामुळे ते दोघे परतले होते. नंतर सलोनीच्या घरच्‍यांनी तिच्‍यावर पाळत ठेवली होती. प्रेमाला असलेला टोकाचा विरोध यामुळे सलोनी आणि राजू यांना प्रेम यशस्वी होईल याची खात्री वाटत नव्‍हती. त्‍यामुळे लग्न होत नसेल तर जगूनही काही उपयोग नाही, असे निर्धार दोघांनी केला आणि दोघे पुन्‍हा पळून गेले होते. जंगलात जाऊन दोघांनी आत्‍महत्‍या केल्याचे समोर येत आहे.

Related Articles

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
Close
%d bloggers like this: