बुलडाणा (घाटावर)

जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांचे आवाहन… जिल्ह्यात बर्ड फ्लू कुठेच नाही… प्रादुर्भावाबद्दल घाबरू नका, पण काळजी घ्या!

बुलडाणा (अजय राजगुरे ः बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः देशातील राज्यस्थान, मध्यप्रदेश आणि हिमाचलप्रदेश या राज्यांमध्ये कावळे, वन्यपक्षी व स्थलांतरीत पक्षी यांच्यात बर्ड फ्लू रोगाचा प्रादुर्भाव दिसून आला आहे. मात्र बुलडाणा जिल्ह्यात अद्याप बर्ड फ्लूचा शिरकाव झालेला नाही. जनतेने प्रादुर्भावाबद्दल भीती बाळगण्याचे कारण नाही. मात्र काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांनी केले आहे.

जिल्हाधिकार्‍यांच्या दालनात याबाबत तातडीची बैठक बोलाविण्यात आली होती. त्यावेळी श्री. रामामूर्ती बोलत होते. बैठकीला पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. बोरकर, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. ठाकरे आदींसह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. जिल्ह्यात कावळे किंवा पक्षी मृत अवस्थेमध्ये दिसल्यास तात्काळ नजिकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याना कळवावे. परंतु बर्ड फ्लू रोगापासून मानवाच्या जिवितास कोणताही धोका नाही. नागरिकांनी कोंबड्यांचे मांस व अंडी शिजवूनच खावे, असे आवाहन यावेळी डॉ. पी..जी. बोरकर यांनी केले आहे.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: