क्राईम डायरीमुख्य बातम्या

जिल्हाभरातून “बुलडाणा लाइव्ह” ला फोन; आमचीही झाली “अशीच’ फसवणूक; त्यावर पोलीस अधिकाऱ्यांनी दिला “हा’ सल्ला!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः फेसबुकवर सुंदर मुलीची फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारल्यांतर व्हाॅट्स अॅपवर युवकाला न्यूड व्हिडीओ कॉल करून तिने त्‍याला ब्लकॅमेल केल्याचा धक्कादायक प्रकार काल, 18 जूनला खामगाव तालुक्यातील पातोंडा पेंडका येथे समोर आला होता. याप्रकरणी युवकाने धाडस दाखवत खामगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. या घटनेचे वृत्त प्रसिद्ध करताच बुलडाणा लाइव्हला अनेक फोन आले. आमचीही अशीच फसवणूक झाल्याचे मात्र भीतीपोटी तक्रार न दिल्याचे त्‍यांनी सांगितले. सेक्सटॉर्शनची (sextortion) अनेक प्रकरणे जिल्ह्यात घडल्याचे यानिमित्ताने समोर आले आहे.

दिवठाणा (ता. चिखली) येथील 19 वर्षीय युवकासोबतही असाच प्रकार घडला. काही दिवसांपासून फेसबुकवर मैत्रीण झालेल्या सुंदर तरुणीने त्याला व्हिडिओ कॉल केला. दोघेही न्यूड झाले. तिने व्हिडिओ रेकॉर्ड करून युवकाला पाठवला. 20 हजार रुपये दिले नाही तर व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड करण्याची धमकी दिली. असाच प्रकार मोताळा, मलकापूर, शेळगाव आटोळ, चिखली येथील युवकांसोबतही झाल्याचे त्यांनी बुलडाणा लाइव्हला सांगितले. चिखली शहरात तर अनेकांसोबत असा प्रकार घडल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र इभ्रतीला घाबरून तक्रार देण्यासाठी कुणीही समोर आले नाही.

फसवणूक टाळण्यासाठी हे करा…
बुलडाणा येथील सायबर क्राईम ब्रँचचे सहायक पोलीस निरिक्षक विलासकुमार सानप यांनी बुलडाणा लाइव्‍हशी बोलताना अशा प्रकारच्‍या घटना टाळण्यासाठी काही सूचना केल्या आहेत. त्‍या अशा ः

 • मित्र यादी वाढवण्यासाठी आणि लाईक्सच्या मोहापायी अनेक जण अनोळखी व्यक्तींनाही फेसबुकवर मित्र बनवतात.अनोळखी व्यक्तींच्या फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारू नयेत.
 • फेसबुक, व्‍टिटर, इन्स्टाग्रामसाठी सशक्त पासवर्डचा वापर करा. त्यामुळे छोटे मोठे अल्फाबेट, सिम्बॉल आणि अंकांचा वापर करावा.
 • तुमची व्यक्तिगत माहिती सार्वजनिक करू नका.
 • कोणत्याही अनावश्यक आणि अनोळखी लिंक्सवर क्लिक करू नका.
 • मोबाइल वारंवार अपडेट करावा.
 • फेसबुकवर कपल चॅलेंज, सिंगल चॅलेंज असे ट्रेंड येतात त्याबाबतीत फोटो अपलोड करताना सावधगिरी बाळगावी.
 • फेसबुकवर तुमचे प्रोफाइल लॉक करून ठेवा. जेणेकरून अनोळखी लोकांना तुमचे फोटो आणि व्यक्तिगत माहिती चोरता येणार नाही.
 • फोन पे, गुगल पे यांचा कस्टमर केअर क्रमांक गुगलवर सर्च करू नका. त्यासाठी त्यांच्या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
 • पॉर्न लिंक्सवरून अधिक फसवणूक होण्याची शक्यता असते. सावधगिरी बाळगावी.
 • कोणतीही वेबसाईट्स उघडण्यापूर्वी किंवा लिंक ओपन करण्यापूर्वी https असल्याची खात्री करावी.
 • कोणतीही फसवणूक झाल्याचे लक्षात येताच पुरावे डिलीट न करता संकोच न करता पोलिसांत तक्रार द्यावी.

Related Articles

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
Close
%d bloggers like this: