कोरोना अपडेट्समुख्य बातम्या

जिल्हाभरात 69 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले, 17 रुग्णांना डिस्चार्ज

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात आज, 3 जानेवारीला 69 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण समोर आले असून, दिवसभरात 17 रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 717 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 648 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून, 17 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहेत. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 63 व रॅपीड अँटिजेन टेस्टमधील 6 अहवालांचा समावेश आहे. निगेटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 581 तर रॅपिड टेस्टमधील 67 अहवालांचा समावेश आहे.

पॉझिटिव्ह आलेले अहवाल

बुलडाणा शहर ः 5, खामगाव शहर : 13, खामगाव तालुका : पारखेड 1, गोंधनपूर 1, चिखली शहर : 8, चिखली तालुका : वळती 2, कोलाबा 1, मंगरूळ 1, गोद्री 5, खंडाळा 1, चंदनपूर 1, ईसोली 1, देऊळगाव राजा शहर : 3, मोताळा तालुका : बोराखेडी 1, टाकळी 1, पिंपळगाव देवी 2, जळगाव जामोद शहर : 2, सिंदखेड राजा तालुका ः सावखेड तेजन 3, वडाळी 2, संग्रामपूर तालुका ः सावळी 1, खिरोडा 2, टुनकी 1, शेगाव तालुका : गव्हाण 1, जवळा 2, शेगाव शहर : 2, मलकापूर शहर : 4

17 रुग्णांनी केली कोरोनावर मात

आज 17 रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. विविध तालुक्यांतील कोविड केअर सेंटरनुसार सुटी देण्यात आलेले रुग्ण असे ः खामगाव : 7, चिखली : 1, बुलडाणा : अपंग विद्यालय 1, शेगाव : 2, नांदुरा : 1, देऊळगाव राजा : 2, जळगाव जामोद : 2, मलकापूर: 1.

295 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू

आजपर्यंत 91332 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 12232 कोरोनाबाधित रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. तसेच 878 स्वॅब नमुने कोविड चाचणीसाठी घेण्यात आले आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 12679 कोरोनाबाधित रुग्ण असून, जिल्ह्यात सध्या रुग्णालयात 295 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 152 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: