बुलडाणा (घाटावर)मुख्य बातम्या

जिल्ह्याचा ग्राफ खाली; पण 6 तालुक्यांतील उद्रेक चढताच! देऊळगाव राजात कोरोनाची शंभरी!!आज पावणेसातशे पॉझिटिव्ह

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः मंगळवार 916 पॉझिटिव्हमुळे यंत्रणांच्या उरात धडकी भरविणारा ठरला! त्या तुलनेत आज, 14 एप्रिलला जिल्ह्यातील कोरोनाचा आलेख 676 पर्यंत खाली उतरल्याने यंत्रणांनी काहीसा सुटकेचा श्वास सोडला! मात्र 6 तालुक्यांतील कोरोनाचा चढता आलेख व उद्रेक आणि 2 तालुक्यांनी गाठलेली शंभरी लक्षात  घेतली तर हा दिलासा पोकळच ठरावा असाच आहे.

काही दिवस शांत राहिल्यावर कोविडने काल, 13 तारखेला फणा वर काढत 916 चा आकडा गाठला. यामुळे प्रशासन व आरोग्य यंत्रणा थक्क झाल्या! यामुळे घटनाकारांच्या जयंतीदिनी येणारा आकडा काय येतो ही धाकधूक होती. मात्र ही धाकधूक अवाजवी ठरली असून, गत 24 तासांत पावणेसातशे पॉझिटिव्ह आढळून आले. (दुर्दैवाने हा आकडाही कमी किंवा दिलासादायक वाटायला लागला आहे) मात्र जिल्ह्याचा आकडा कमी वाटत असला तरी 6 तालुक्यांत कोरोनाने जोरदार मुसंडी मारली आहे. आघाडीवरील बुलडाणा तालुक्याने दीडशेच्या घरापर्यंत (146) मजल मारली तर देऊळगाव राजा तालुक्याने शंभरी पार करत 107 चा आकडा गाठला. मेहकर 88, नांदुरा 64, सिंदखेड राजा 68, शेगाव 58 या तालुक्यांची आकडेवारी चिंता वाढविणारी ठरली आहे. या तुलनेत खामगाव 29, चिखली 30, मलकापूर 33, मोताळा 23, लोणार 16 या तालुक्यांतील कोरोना आटोक्यात आहे. जळगाव जामोदमध्ये 13 रुग्ण आढळले असतानाच संग्रामपूरमध्ये एकही रुग्ण नसल्याचा चमत्कार पुन्हा घडला आहे.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: