क्राईम डायरीमुख्य बातम्या

जिल्ह्यातील आणखी दोन मोटारसायकली गायब!; लोणारमध्ये घडली घटना

लोणार (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः लोणार शहरातून दोन मोटारसायकली चोरीला गेल्या आहेत. लोणार सरोवराच्‍या वनमजुराने लोणार पोलीस ठाणे गाठून त्‍याची व अन्य एकाची मोटारसायकल चोरीला गेल्याची तक्रार दिली आहे. त्‍यावरून पोलिसांनी चोरट्याविरुद्ध गुन्‍हा दाखल केला आहे.

मधुकर रेवासिंग राठोड (५२, रा. गंधारी, ता. लोणार) हे लोणार सरोवरात वन मजूर म्हणून काम करतात. पुतण्या राहुल अशोक राठोड याच्‍या नावावर असलेली होंडा शाइन मोटारसायकल (क्र. एमएच २८ एयू ५६२७) ते वापरत होते. ७ जुलैला सकाळी १० वाजता ते मोटारसायकलने लोणारला आले. दुपारी एकला लोणार ते मंठा रोडवरील लोणार सरोवराच्या काठाने रोडच्या बाजूला निसर्ग निर्वाचन केंद्राजवळील झाडाखाली त्‍यांनी मोटारसायकल उभी केली. त्‍यानंतर ते सरोवराकडे कामासाठी निघून गेले.

काम संपल्यावर तीनला ते मोटारसायकलकडे आले असता ती दिसली. त्‍यांनी परिसरात सगळीकडे शोध घेऊन मोटारसायकल मिळून आली नाही. लोणार येथील माळीपुरा येथे राहणारे विजय सुधाकर शिलवण यांची स्प्लेंडर मोटारसायकलसुद्धा (एमएच २८ एएफ ६४७८) चोरीला गेल्याचे कळाले. मात्र तिची कागदपत्र नसल्याने व जुनी झाली असल्याने त्यांनी तक्रार दिली नव्हती. राठोड यांची मोटारसायकल (किंमत ३० हजार)आणि विजय शिलवत यांची मोटारसायकल किंमत १० हजार) अशा ४० हजारांच्या दोन मोटारसायकली चोरी गेल्याची तक्रार राठोड यांनी दिली. तपास बीट अंमलदार पोहेकाँ रामकिसन गिते करत आहेत.

Related Articles

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
Close
%d bloggers like this: