बुलडाणा (घाटावर)मुख्य बातम्या

जिल्ह्यातील परवानाधारक रिक्षा चालकांना दिलासा… दीड हजार रुपये सानुग्रह अनुदान मिळणार

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः राज्यात कोरोनाच्‍या संकटामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या परवाना धारक रिक्षाचालकांना राज्‍य सरकारने दिलासा दिला आहे. एक वेळ अर्थसाह्य म्हणून रुपये १५०० सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. परवानाधारक रिक्षा चालकांना द्यावयाचा लाभ थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी संगणक प्रणाली विकसित करण्यात आली आहे. या लाभासाठी सर्व परवाना रिक्षाधारकांनी ऑनलाइन पध्दतीने अर्ज सादर करावा आहे.

अर्ज पडताळणी करून चालकांच्या खात्यात मंजूर अनुदानाची रक्कम जमा केली जाईल. याकरिता रिक्षाचालकांना http:transport.maharashtra.gov.in संकेतस्थळावर ऑनलाइन पध्दतीने अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी त्यांचे आधार कार्ड मोबाइल क्रमांकाशी जोडणे आवश्यक आहे. या जोडणीची सुविधा आर. टी. ओ. कार्यालय, बुलडाणा येथे उपलब्ध केली आहे. ऑनलाइन प्रणालीवर अर्ज करताना आधार कार्ड सोबत लिंक असलेल्या मोबाइल क्रमांकावर otp क्रमांक प्राप्त झाल्यानंतर ऑनलाइन अर्जात त्याचा वाहक क्रमांक, अनुज्ञप्ती क्रमांक, आधार क्रमाक नोंद करावा. अर्जदाराने ऑनलाइन अर्ज सादर केल्यानंतर परिवहन कार्यालय अर्जातील नमुद तपशील कार्यालयातील अभिलेखाशी पडताळून सत्यता तपासल्यानंतर ऑनलाईन पध्दतीने अर्ज मंजूर करून अर्जदाराच्या बँक खात्यात १५०० रुपये शासनाकडून जमा करण्यात येणार आहेत. ही सर्व प्रक्रिया ऑनलाईन पध्दतीने होणार असल्याने कार्यालयात उपस्थित राहणाची आवश्यकता नाही. सर्व परवाना धारक रिक्षाचालकांनी ऑनलाईन पध्दतीने सानुग्रह अनुदान मिळण्याकरिता अर्ज करावे, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

Related Articles

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
Close
%d bloggers like this: