बुलडाणा (घाटावर)मुख्य बातम्या

जिल्ह्यातील रुग्णालयांना 1 हजार रेमडेसिवीरचे वितरण; तुटवड्याला बसणार चाप!; वाचा कोणत्‍या हॉस्पिटलला किती दिलीत इंजेक्‍शन्‍स!

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यातील खासगी कोविड रुग्णालयांना जिल्हा प्रशासनामार्फत 29 एप्रिल रोजी 1 हजार रेमडेसिवीरचे वितरण करण्यात आले आहे, अशी माहिती प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी भूषण अहिरे यांनी बुलडाणा लाइव्‍हशी बोलताना दिली.

खासगी रुग्णालयांना बेड व रुग्ण संख्येनुसार वितरण करण्यात आलेले रेमडेसिवीर असे ः बुलडाणा : लद्धड हॉस्पिटल 39 इंजेक्शन, मेहत्रे हॉस्पिटल 35, रविदीप हार्ट केअर हॉस्पिटल 11, निकम हॉस्पिटल 10, जाधव पल्स हॉस्पिटल 13, सहयोग हॉस्पिटल 22, आशीर्वाद हॉस्पिटल 30, सिद्धीविनायक हॉस्पिटल 39, काटकर हॉस्पिटल 14, शिवसाई हॉस्पिटल 30, संचेती हॉस्पिटल 19, न्यू लाईफ कोविड हॉस्पिटल 1, सोळंकी हॉस्पिटल 7, सावजी हॉस्पिटल 14,  चिखली : योगीराज हॉस्पिटल 45, हेडगेवार हॉस्पिटल 39, गुरुकृपा हॉस्पिटल 16, तायडे हॉस्पिटल 31, दळवी हॉस्पिटल 24, पानगोळे हॉस्पिटल 20, खंडागळे हॉस्पिटल 15, गंगाई हॉस्पिटल 15, जैस्वाल हॉस्पिटल 16, मलकापूर : झंवर हॉस्पिटल 15, ऑक्सीजन कोविड केअर सेंटर 42, कोलते हॉस्पिटल 18, राईट केअर हॉस्पिटल 9, आशीर्वाद हॉस्पिटल 11, नांदुरा : स्वामी समर्थ कोविड सेंटर 35, शेगाव : श्री गजानन कोविड हेल्थ केअर 23, सोळंके कोविड केअर हॉस्पिटल 19, शामसखा हॉस्पिटल 41, खामगाव : चव्हाण हॉस्पिटल 9, अश्विनी नर्सिंग हॉस्पिटल 24, श्रीराम हॉस्पिटल 5, आईसाहेब मंगल कार्यालय कृष्णअर्पण 23, मेहकर : मातोश्री हॉस्पिटल 26, मापारी हॉस्पिटल 26, गिताई सुश्रूत हॉस्पिटल 15, गोविंद क्रिटीकल 13, श्री. गजानन हॉस्पिटल 35, अजंता हॉस्पिटल 6, मेहकर मल्‍टिस्‍पेशालिटी 26, देऊळगाव राजा : बालाजी मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल 7, संत गाडगेबाबा हॉस्पिटल 20, मी अँड आई हॉस्पिटल 7,  सिंदखेड राजा : जिजाऊ हॉस्पिटल 21, विवेकानंद हॉस्पिटल हिवरा आश्रम ता. मेहकर 5 असे एकूण 1000 रेमडिसिवीरचे वितरण करण्यात आले आहे. प्राप्त साठ्यापैकी 10 टक्के राखीव साठा आपत्कालीन परिस्थितीसाठी राखीव ठेवण्यात आला आहे. हा साठा फ्रंटलाईन वर्कर तथा डॉक्टर्स, इतर कर्मचारी वर्ग तसेच अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांच्याकरिता शासनाच्‍या सूचनेप्रमाणे जिल्हाधिकाऱ्यांच्‍या आदेशान्वये राखीव ठेवण्यात आला आहे. सर्व संबंधित डॉक्टर्स व फार्मासिस्ट यांनी या औषधाचा वापर हा योग्यरित्या व अत्यावश्यक असलेल्या रुग्णांकरिताच प्राधान्याने वापरण्यत यावा, असे निर्देश देण्यात आल्याचे  श्री. अहीरे यांनी स्पष्ट केले आहे.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: