क्राईम डायरीमुख्य बातम्या

जिल्ह्यातील 4 ठाणेदारांची बदली नियंत्रण कक्षात

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः कर्तव्यदक्ष जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद चावरिया यांनी मलकापूर शहर, जलंब, अंढेरा आणि हिवरखेड पोलीस ठाण्याच्या ठाणेदारांना नियंत्रण कक्षात जमा करून घेतले आहे. आता त्या त्या ठिकाणी नवे ठाणेदार काम पाहतील. यात चिखली ठाण्यातील राजवंत आठवलेंकडे अंढेरा, हिवरखेडचे ठाणेदार एकनाथ बावस्कर यांच्याकडे बुलडाणा ग्रामीण, बुलडाणा ग्रामीण ठाण्यातील हरिविजय बोबडे यांच्याकडे हिवरखेड, खामगाव शहरातील शिवाजीनगर ठाण्यातील धीरज बांडे यांच्याकडे जलंब ठाण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. मलकापूर शहर ठाणेदार म्हणून प्रल्हाद काटकर काम काम पाहणार आहेत.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: