बुलडाणा (घाटावर)मुख्य बातम्या

जिल्ह्यात कोरोनाचे सहा बळी!; एकूण बाधितांचा आकडा 41 हजार पार!!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा)ः जिल्ह्यात आज, 4 एप्रिलला कोरोनाने सहा बळी घेतले आहेत. उपचारादरम्यान चिखली येथील 70 वर्षीय महिला, महावीरनगर, बुलडाणा येथील 70 वर्षीय महिला, देऊळघाट ता. बुलडाणा येथील 75 वर्षीय महिला, गोंधनपूर ता. खामगाव येथील 79 वर्षीय महिला, रेखा प्लॉट, खामगाव येथील 71 वर्षीय महिला व वाडी, खामगाव येथील 57 वर्षीय पुरुष रुग्णाचा मृत्यू झाला आहे. दरम्‍यान, दिवसभरात नवे 1022 रुग्‍णांची भर पडली असून, 945 रुग्‍ण बरे झाल्याने त्‍यांना रुग्‍णालयातून डिस्‍चार्ज देण्यात आला.

प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 5770 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 4748 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 1022 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहे. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालांमध्ये 699 प्रयोगशाळेतील व रॅपीड टेस्टमधील 323 अहवालांचा समावेश आहे. निगेटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतून 672 तर रॅपिड टेस्टमधील 4076 अहवालांचा समावेश आहे.

पॉझिटिव्‍ह आलेले अहवाल
बुलडाणा शहर व तालुका : 238, खामगाव शहर व तालुका : 144, शेगाव शहर व तालुका : 4, देऊळगाव राजा तालुका व शहर : 57, चिखली शहर व तालुका : 108, मेहकर शहर व तालुका : 81, मलकापूर शहर व तालुका : 134, नांदुरा शहर व तालुका : 70, लोणार शहर व तालुका : 28, मोताळा शहर व तालुका :23, जळगाव जामोद शहर व तालुका : 73, सिंदखेड राजा शहर व तालुका : 49 आणि संग्रामपूर शहर व तालुका : 13 पॉझीटीव्ह आल्या आहेत.
6052 रुग्णांवर उपचार सुरू
आजपर्यंत 237308 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 34736 कोरोनाबाधित रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. आज रोजी 3514 नमुने कोविड चाचणीसाठी घेण्यात आले आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 41070 कोरोनाबाधित रुग्ण असून सध्या रुग्णालयात 6052 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आजपर्यंत 282 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: