बुलडाणा (घाटावर)मुख्य बातम्या

जिल्ह्यात नव्या 17 रुग्‍णवाहिका दाखल, रुग्‍णांना मिळणार तत्‍पर सेवा

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा ) ः कोरोना रुग्णांची ने-आण करण्यासाठी जिल्ह्यात रुग्णवाहिकांची संख्या मोजकीच होती. याकडे गांभीर्याने लक्ष घालून राज्य शासनाने जिल्ह्याला नवीन 17 रुग्णवाहिका दिल्या आहेत. त्यामुळे आता जिल्ह्यातील रुग्णांच्या तत्पर सेवेसाठी रुग्णवाहिका धावणार आहेत.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मागील अर्थसंकल्पीय भाषणात नव्या रुग्णवाहिका देण्याचे आश्वासन दिले होते. बुलडाणा जिल्ह्यात 17 नवीन रुग्णवाहिका 31 मे रोजी दाखल झाल्या आहेत. या नवीन रुग्णवाहिकांवर जिल्हा शल्य चिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांचे नियंत्रण राहणार आहे. जिल्ह्यातील आवश्यक त्या प्राथमिक आरोग्य केंद्रांना या रुग्णवाहिका देण्यात येणार आहेत. वातानुकुलीत असलेल्या एका रुग्णवाहिकेची किंमत जवळपास 15 लाख 70 हजार रुपये सांगितली जात आहे.

जिल्हा सामान्य रुग्णालय बुलडाणा 2, महिला रुग्णालय बुलडाणा 2, सामान्य रुग्णालय खामगाव 1, सईबाई मोटे सामान्य रुग्णालय शेगाव 2, ग्रामीण रुग्णालय मेहकर 2, ग्रामीण रुग्णालय लोणार 1, ग्रामीण रुग्णालय मोताळा 1 तसेच जिल्हा परिषद अंतर्गतच्या प्राथमिक आरोग्य केंद्र तालखेड 1, नांदुरा 1,जामोद 1, संग्रामपूर 1, अटाळी 1, सुलतानपूर 1, रायगाव 1 व जऊळखेड प्राथमिक आरोग्य केंद्राला 1 याप्रमाणे रुग्णवाहिका दिल्या जाणार आहेत, अशी माहिती जिल्हा सामान्य रुग्णालयाचे सेवा अभियंता ए. एम. जवंजाळ यांनी बुलडाणा लाइव्‍हला दिली.

Related Articles

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
Close
%d bloggers like this: