बुलडाणा (घाटावर)मुख्य बातम्या

जिल्ह्यात भारत बंदचा फज्जा; काँग्रेसच्या उपोषणात कोरोना नियमांना बगल; शेतकरी संघटनांचे दुर्लक्ष

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः विविध शेतकरी संघटनांनी पुकारलेला आणि काँग्रेसने पाठिंबा दिलेल्या आजच्या भारत बंद आंदोलनाचा फज्जा उडाल्याचे चित्र जिल्ह्यात दिसून आले. काँग्रेसने केलेले उपोषण वगळता जिल्ह्यातील शेतकरी संघटनाही भारतबंद आंदोलनात सहभागी झाल्याचे दिसले नाही. बुलडाण्यात जयस्तंभ चौकात जिल्हा काँग्रेसने एकदिवसीय उपोषण केले. मलकापुरातील काँग्रेसच्या आंदोलनात मात्र कोरोना नियमांची ऐसी तैसी झाल्याचे चित्र होते.

केंद्र सरकारने पारित केलेल्या  कृषी कायद्यांच्या विरोधात शेतकरी संघटनांनी भारत बंदची हाक दिली होती. या बंदला राष्ट्रीय पक्ष असलेल्या काँग्रेसनेही पाठिंबा दिल्याने बंद यशस्वी होईल, अशी शक्यता वर्तविण्यात होती. मात्र  तसे चित्र दिवसभर दिसले नाही. बुलडाण्याच्या जयस्‍तंभ चौकात काँग्रेस नेत्यांनी लाक्षणिक उपोषण केले. याव्यतिरिक्त  मलकापुरात आमदार राजेश एकडे यांच्या नेतृत्वात तहसील कार्यालयासमोर उपोषण करण्यात आले. मात्र कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने भाजपच्या आंदोलनावर टीका करणाऱ्या नेत्यांनाच कोरोना नियमांचा विसर पडल्याची चर्चा  होती. मलकापुरात तर अगदी दाटीवाटीने काँग्रेस कार्यकर्ते बसले होते. तोंडावर लावायचा मास्क खुद्द आमदार एकडेंनी गळ्यात अडकवल्याचे दिसत होते. शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेने यापूर्वीच आंदोलनाला पाठिंबा नसल्याचे जाहीर केले होते. बुलडाण्यात झालेल्या आंदोलनात जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांच्‍यासह माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ, जिल्हा परिषद अध्यक्षा मनीषा पवार, जिल्हा परिषद महिला बालकल्याण सभापती ज्योती पडघान, बुलडाणा पंचायत समिती सभापती उषा चाटे,सुनील सपकाळ, काँग्रेस तालुकाध्यक्ष अमोल तायडे, शहराध्यक्ष दत्त काकस, सुनील पनपालिया, चिखली तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष बाळु साळोक यांच्‍यासह काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते. मलकापूर येथील तहसील कार्यालयासमोर झालेल्या उपोषणात आमदार राजेश एकडे यांच्‍यासह मलकापूर कृषी उत्पन्न समितीचे मुख्य प्रशासक डॉ.अरविंद कोलते, मलकापूर चे नगराध्यक्ष अॅड. हरीष रावळ, हाजी रशीदखा जमादार, संतोष रायपुरे, मलकापूर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष बंडू चौधरी, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष माधवराव गायकवाड, शहर काँग्रेसचे अध्यक्ष राजू पाटील, अरुण अग्रवाल, ज्‍येष्ठ काँग्रेस नेते मनोज देशमुख, सोपान शेलकर, प्रमोद अवसरमोल, सौ. मंगला पाटील, महिला काँग्रेसच्या जिल्हा सरचिटणीस ज्योतीताई धोरण, तालुका महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सविताताई जंगले, देवेंद्र पाटील, डॉ. अनिल खर्चे  राजू जवरे, प्रवीण क्षीरसागर, पांडुरंग संभारे, गजानन तायडे, राजू तायडे, अशोक मराठे, विलास खर्चे, अतुल पाटील, सुभाष ढोले, संतोष निवाने, अमित खर्चे, अनिलभाऊ गांधी, संजय पाटील, गजेंद्र सोनवणे, फिरोज खान, आकाश ढोलकर, पांडुरंग चोपडे,  सुभाष पाटील, हितेश पाटील, रमेश खाचणे, गजानन भारंबे, भीमराव धोरण, मनोहर पाटील , संतोष भगत, पवन रायपुरे, प्रवीण पाटील, भगवान गाडे, विनय काळे, निवृत्ती तांबे ,अनिल भारंबे ,चंद्रकांत साळुंके,अतुल देशमुख, दिलीप गोळीवाले, इस्तियाक खान जमादार, रउफ शेठ बागवान, संभाजी शिर्के, मयूर नरवाडे, राजू उखर्डे, फिरोज खान अफसर खान, अनंता तायडे, विलास कांडेलकर, वाजीद खान, समाधान बविसाने, पांडुरंग चोपडे ,कैलास धाडे, नारायण धाडे, सुधीर पाचपांडे, अतुल पाटील, राजू पाटील आदी काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: