बुलडाणा (घाटावर)मुख्य बातम्या

जिल्ह्यात रेमडेसिवीर इंजेक्शनची चढ्या दराने विक्री; रुग्णांची आर्थिक लूट!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः  कोरोना रुग्णांसाठी प्रभावी औषध म्हणून उपयोगात येणाऱ्या रेमडेसिवीर या इंजेक्शनची जिल्ह्यात चढ्या दराने विक्री होत असल्याचे समोर आले आहे. राज्याचे अन्‍न व औषधी प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी या इंजेक्शनच्या किमती नियंत्रणात आणणार असल्याचे म्हटले असले तरी काही ठिकाणी  अधिक दराने विक्री होत आहे. 1800 ते 2200 रुपयांना इंजेक्शन मिळणे अपेक्षित असताना काही रुग्णालयांत 2500 रुपये प्रति इन्जेक्शन या दराने विक्री होत आहे.

रेमडेसिवीर इंजेक्शनच्या उत्पादकांनी औषधांचा पुरवठा करणाऱ्या विक्रेत्यांना तसेच रुग्णालयांना 800 ते1300 रुपयांना म्हणजेच सरासरी 1040 रुपयांना औषधांचा पुरवठा केला आहे. त्यावर विक्रेत्यांनी  जास्तीत जास्त 20 ते 30 टक्के रक्कम आकारून औषध विक्री करण्याचा निर्देश देण्यात आले होते. मात्र अनेक रुग्णालयांमध्ये इंजेक्शनची किंमत अडीच हजार रुपयांच्या घरात असल्याचे निदर्शनास आले आहे. रेमडेसिवीर इंजेक्शनचा कुठलाही तुटवडा सध्या निर्माण झालेला नसताना तुडवडा निर्माण झाल्याचे भासवण्यात येत आहे. त्यामुळे नाईलाजाने 2500 रुपये किमतीत इंजेक्शन खरेदी केल्याचे काही रुग्णांच्या नातेवाईकांनी सांगितले. अधिक किंमतीत इंजेक्शन खरेदी करावे लागत असल्याने रुग्ण तसेच रुग्णांच्‍या नातेवाईकांची आर्थिक पिळवणूक होत असल्याचे चित्र आहे.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: