बुलडाणा (घाटावर)मुख्य बातम्या

जिल्ह्यात सव्वा तीन हजार कोरोनाबाधित हॉस्पिटलमध्ये घेताहेत उपचार!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात आज, 13 मार्चला नव्या 362 नव्या कोरोनाबाधितांची भर पडली असून, 535 रुग्‍णांनी कोरोना मात केल्याने त्‍यांना रुग्‍णालयातून डिस्‍चार्ज देण्यात आला आहे. सध्या जिल्ह्यातील रुग्‍णालयांत 3296 बाधित उपचार घेत आहेत.

प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 1364 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 1002 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून, 362 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहेत. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 284 व रॅपिड टेस्टमधील 78 अहवालांचा समावेश आहे. निगेटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतून 528 तर रॅपिड टेस्टमधील 474 अहवालांचा समावेश आहे.

पॉझिटिव्‍ह आलेले अहवाल

बुलडाणा शहर : 34, बुलडाणा तालुका : सुंदरखेड 3, चांडोळ 1, इरला 1, पांगरी 1, पिंपळगाव सराई 1, शिरपूर 2, मढ 2, डोंगरखंडाळा 1, खामगाव शहर : 50, खामगाव तालुका : सुटाळा 6, हिवरा बुद्रूक 1, पिंपळगाव राजा 2, जनुना 1, पारखेड 2, जऊळका 1, शिर्ला नेमाने 1, चितोडा 1, पोरज 1, लाखनवाडा 4, टेंभुर्णा 1, नांदुरा तालुका : मामुलवाडी 2, मलकापूर शहर : 41, मलकापूर तालुका : लोणवडी 4, उमाळी 1, पिंपळखुटा 1, कुंड 1, आळंद 1, चिखली शहर : 56, चिखली तालुका : केळवद 1, मालगणी 1, शेलूद 1, देऊळगाव धनगर 1, सवणा 1, पळसखेड जयंती 2, बोरगाव काकडे 1, शेलूद 1, साकेगाव 1, वरूड 2, पेठ 2, अमडापूर 3, सवडत 1, सावरगाव डुकरे 1, धोत्रा नाईक 2, कोलारा 2, तोरणवाडा 2, भोगावती 1, येवता 1, शेलोडी 1, सोमठाणा 2, शेलगाव जहागीर 1, करवंड 2, हराळी 1, खैरव 1, अंत्री कोळी 1, अंत्री खेडेकर 2, अमोना 1, वैरागड 1, सिंदखेड राजा शहर : 4, सिंदखेड राजा तालुका : साखरखेर्डा 1, दुसरबीड 2, हिवरखेड पूर्णा 2, सावखेड तेजन 1, शिवणी टाका 1, हनवतखेड 1, किनगाव राजा 1, मोहाडी 1, रताळी 2, बाळ समुद्र 2, मोताळा तालुका : धामणगाव बढे 1, चिंचखेड 2, तरोडा 1, मोताळा शहर : 1, शेगाव शहर : 6, संग्रामपूर तालुका : सोनाळ 4, शेवगा 1, खिरोडा 1, सावळी 1, टूनकी 2, निरोड 1, पातुर्डा 2, लाडणापूर 1, निवाना 1, संग्रामपूर शहर :4, जळगाव जामोद शहर : 1, जळगाव जामोद तालुका : आसलगाव 2, देऊळगाव राजा शहर : 24, देऊळगाव राजा तालुका : धोत्रा नंदाई 2, दगडवाडी 1, कुंभारी 1, लोणार शहर : 8, लोणार तालुका : वडगाव तेजण 4, सुलतानपूर 1, गोत्रा 1, मेहकर शहर :1, मेहकर तालुका : हिवरा आश्रम 1, लोणी गवळी 1, सावत्रा 1, नांदुरा शहर : 1, मूळ पत्ता हांडा जिंतूर जि. परभणी 1 अशाप्रकारे जिल्ह्यात 362 रुग्ण आढळले आहेत.

535 रुग्‍णांनी केली कोरोनावर मात

आज 535 रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. कोविड केअर सेंटरनुसार सुटी देण्यात आलेले रुग्ण  असे ः बुलडाणा : अपंग विद्यालय 61, मुलींचे वसतिगृह 9, कोविड हॉस्पिटल 14, शेगाव : 44, खामगाव : 58, नांदुरा : 15, देऊळगाव राजा : 34, चिखली : 168, मेहकर : 24, लोणार : 29, जळगाव जामोद : 3, सिंदखेड राजा : 25, मलकापूर : 43, संग्रामपूर : 6, मोताळा : 2

बाधितांचा आकडा 24469 वर

आजपर्यंत 157750 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 20958 कोरोनाबाधित रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. आज रोजी 3097 नमुने कोविड चाचणीसाठी घेण्यात आले आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 24469 कोरोनाबाधित रुग्ण असून,  जिल्ह्यात सध्या रुग्णालयात 3296 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. आजपर्यंत 215 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: