बुलडाणा (घाटावर)मुख्य बातम्या

जिल्ह्यात ४० नव्या कोरोनाबाधितांची भर; ३२ रुग्णांना डिस्चार्ज

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : जिल्ह्यात आज, १२ जानेवारीला ४० नवे कोरोनाबाधित आढळले असून, ३२ रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.
प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 287 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 247 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 40 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहेत. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 34 व रॅपीड टेस्टमधील 6 अहवालांचा समावेश आहे. निगेटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 112 तर रॅपिड टेस्टमधील 135 अहवालांचा समावेश आहे.
पॉझिटिव्ह आलेले अहवाल
बुलडाणा शहर : 10, बुलडाणा तालुका : सागवन 1, दहिद 1, देऊळगाव राजा तालुका : देऊळगाव मही 1, चिखली शहर :8, चिखली तालुका : चंदनपूर 1, मोताळा तालुका : राजूर 1, मोहगाव 1, मोताळा शहर : 1, सिंदखेड राजा तालुका : साखरखेर्डा 2, पळसखेड चक्का 1, पिंपळगाव लेंडी 1, सिंदखेड राजा शहर : 1, खामगाव शहर : 8, जळगाव जामोद शहर : 1, जळगाव जामोद तालुका : रुधाना वकाना 1
३२ रुग्णांनी केली कोरोनावर मात
आज 32 रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. कोविड केअर सेंटरनुसार सुटी देण्यात आलेले रुग्ण असे : चिखली : 7, देऊळगाव राजा : 6, खामगाव :2, बुलडाणा : आयुर्वेद महाविद्यालय 5, अपंग विद्यालय 9, शेगाव :1, मोताळा : 1, सिंदखेड राजा : 1
329 कोरोना बाधित रुग्णांवर उपचार सुरू
आजपर्यंत 94699 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 1568 कोरोनाबाधित रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे सुटी देण्यात आलेल्या रुग्णांची एकूण संख्या 12568 आहे. तसेच 694 स्वॅब नमुने कोविड चाचणीसाठी घेण्यात आले आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 13054 कोरोनाबाधित रुग्ण असून सध्या रुग्णालयात 329 कोरोना बाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 157 कोरोना बाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते यांनी दिली आहे.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: