बुलडाणा (घाटावर)मुख्य बातम्या

जिल्ह्यात 14 केंद्रांवर होणार गहू, मका खरेदी; 30 एप्रिलपर्यंत करा नोंदणी

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः रब्बी हंगामातील ज्वारी, गहू व मका आधारभूत किंमत खरेदी योजनेतंर्गत शेतकऱ्यांना कमी किमतीत धान्य विकावे लागू नये व शेतकऱ्यांना लाभ मिळण्यासाठी जिल्ह्यात शासकीय खरेदी केंद्र सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यानुसार जिल्ह्यात 14 खरेदी केंद्र सुरू झाली असून, येथे 30 एप्रिल 2021 पर्यंत विक्री करण्यासाठी नोंदणी करता येणार आहे.

खरेदी केंद्रांवर येणाऱ्या शेतकऱ्यांनी कोरोना विषयक सुरक्षा नियम पाळावेत. हंगाम 2020-21 मध्ये आधार भूत किंमत योजनेतंर्गत केंद्र शासनाचे वतीने मका प्रति क्विंटल 1850 रुपये, ज्वारी प्रति क्विंटल 2620 रुपये, गूह 1975 प्रति क्विंटल प्रमाणे खरेदी करण्यात येणार आहे. नोंदणी करण्याकरिता शेतकऱ्यांनी आधार कार्ड, 7/12 ऑनलाईन पिकपेरासह, बँक पासबुकची आधार लिंक केलेली झेरॉक्स व मोबाईल क्रमांक आदींसह संबंधित खरेदी केंद्रांवर जाऊन ऑनलाईन नोंदणी करावी. कोविड रुग्णांची जिल्ह्यातील संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी नोंदणी करते वेळी केंद्रावर गर्दी करणे टाळावे, सॅनीटायझरचा उपयोग करावा, तोंडावर मास्क वापरावे, सुरक्षित अंतर ठेवावे आदी बाबींचे पालन करावे. शेतकरी केंद्रावर नोंदणीसाठी अर्ज घेऊन आल्यास सब एजंट संस्थांनी त्यांच्याकडून तात्काळ अर्ज घेऊन शासनाच्या पोर्टलवर नोंदणी करावी, असे जिल्हा पणन अधिकारी यांनी कळविले आहे.

ही आहेत खरेदी केंद्र

  • तालुका सहकारी शेतकरी खरेदी विक्री समिती ः बुलडाणा, दे.राजा, मेहकर, लोणार, मलकापूर, शेगाव, खामगाव, जळगाव जामोद व संग्रामपूर
  • संत गजानन कृषि विकास शेतकरी उत्पादक कंपनी मोताळा
  • सोनपाऊल ॲग्रो प्रोड्युसर कंपनी सुलतानपूर केंद्र साखरखेर्डा, ता. सिंदखेड राजा
  • स्वराज्य शेतीपुरक सहकारी संस्था मर्या. चिखली
  • माँ जिजाऊ फार्मर्स प्रोड्युसर कंपनी देऊळगाव राजा केंद्र सिंदखेड राजा
  • नांदुरा ॲग्रो फार्मर प्रोड्युसर कंपनी लि. नांदुरा केंद्र वाडी.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: