बुलडाणा (घाटावर)मुख्य बातम्या

जिल्ह्यात 36 नव्या कोरोनाबाधितांची भर

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात आज, 4 फेब्रुवारीला नवे 36 कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत, तर 37 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.
प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 356 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 320 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 36 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहेत. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 30 व रॅपीड अँटिजेन टेस्टमधील 6 अहवालांचा समावेश आहे. निगेटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 218 तर रॅपिड टेस्टमधील 102 अहवालांचा समावेश आहे.
पॉझिटिव्ह आलेले अहवाल
खामगाव तालुका : पळशी 2, पिंपळगाव राजा 1, खामगाव शहर : 8, जळगाव जामोद शहर : 1, जळगाव जामोद तालुका : चालठाणा 1, बुलडाणा तालुका : हत्ता 1, देऊळगाव राजा तालुका : देऊळगाव मही 1, देऊळगाव राजा शहर : 4, चिखली शहर : 4, चिखली तालुका : केळवद 2, बेराळा 2, लोणार शहर : 2, सिंदखेड राजा तालुका : मलकापूर पांग्रा 1, साखरखेर्डा 1, मलकापूर तालुका : दाताळा 1, मलकापूर शहर : 4
37 रुग्णांनी केली कोरोनावर मात
आज 37 रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. विविध तालुक्यांतील कोविड केअर सेंटरनुसार सुटी देण्यात आलेले रुग्ण असे ः देऊळगाव राजा : 1, चिखली : 18, बुलडाणा : स्त्री रुग्णालय 2, अपंग विद्यालय 8, शेगाव : 6, मोताळा : 1, दे. राजा : 1.
331 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू
आजपर्यंत 111136 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 13648 कोरोनाबाधित रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. तसेच 1155 स्वॅब नमुने कोविड चाचणीसाठी घेण्यात आले आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 14149 कोरोनाबाधित रुग्ण असून, जिल्ह्यात सध्या रुग्णालयात 331 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 170 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: