कोरोना अपडेट्सबुलडाणा (घाटावर)मुख्य बातम्या

जिल्ह्यात 46 नव्या कोरोनाबाधितांची भर; 19 रुग्णांना डिस्चार्ज; बुलडाणा शहरात एकाच दिवशी 11 रुग्ण समोर!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात आज, 4 जानेवारीला 46 नवे कोरोनाबाधित रुग्ण समोर आले असून, 19 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी मिळाली आहे. बुलडाणा शहरात कोरोनाचे तब्बल 11 रुग्ण समोर आल्याने काळजी वाढली आहे.

प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 502 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 456 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून, 46 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहेत. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 39, रॅपीड अँटिजेन टेस्टमधील 7 अहवालांचा समावेश आहे. निगेटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 409 तर रॅपिड टेस्टमधील 47 अहवालांचा समावेश आहे.

पॉझिटिव्ह आलेले अहवाल

खामगाव शहर : 7, खामगाव तालुका : हिवरा बुद्रूक 1, बुलडाणा शहर : 11, बुलडाणा तालुका : येळगाव 1, पोखरी 1, मलकापूर शहर : 1, देऊळगाव राजा शहर : 6, चिखली शहर : 1, चिखली तालुका : खंडाळा 1, देऊळगाव मुंढे 1, टाकरखेड 1, मेंडगाव 1, मोताळा शहर : 1, मोताळा तालुका : पिंपळगाव देवी 2, सिंदखेड राजा तालुका ः देऊळगाव कोळ 1, शेगाव तालुका : जवळा 2, पाळोदी 1, शेगाव शहर : 3, मेहकर तालुका : कल्याणा 1, जळगाव जामोद शहर : 1

19 रुग्णांना डिस्चार्ज…

आज 19 रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. विविध तालुक्यांतील कोविड केअर सेंटरनुसार सुटी देण्यात आलेले रुग्ण असे ः बुलडाणा : आयुर्वेद महाविद्यालय 1, देऊळगाव राजा : 7, खामगाव : 3, नांदुरा : 2, चिखली : 3, मेहकर : 1, शेगाव : 2.

322 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू

आजपर्यंत 91788 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 12251 कोरोनाबाधित रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. तसेच 535 स्वॅब नमुने कोविड चाचणीसाठी घेण्यात आले आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 12725 कोरोनाबाधित रुग्ण असून सध्या रुग्णालयात 322 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 152 कोरोनाबाधीतांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: