बुलडाणा (घाटावर)मुख्य बातम्या

जिल्ह्यात 59 नव्या कोरोनाबाधितांची भर; 22 रुग्णांना डिस्चार्ज

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात आज, 10 फेब्रुवारीला 59 नव्या कोरोनाबाधितांची भर पडली असून, 22 रुग्ण बरे झाल्याने त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 629 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 570 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून 59 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहेत. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 48 व रॅपीड अँटिजेन टेस्टमधील 11 अहवालांचा समावेश आहे. निगेटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 371 तर रॅपिड टेस्टमधील 199 अहवालांचा समावेश आहे. अशाप्रकारे 570 अहवाल निगेटीव्ह आहेत.
पॉझिटिव्ह आलेले अहवाल
सिंदखेड राजा शहर : 4, सिंदखेड राजा तालुका : शेंदुर्जन 2, मलकापूर पांग्रा 2, लोणार तालुका : तांबोळा 2, धानोरा 1, किन्ही 3, हत्ता 1, पाटोदा 1, लोणार शहर : 1, चिखली शहर : 6, देऊळगाव राजा शहर : 8, देऊळगाव राजा तालुका : लिंबा 1, शेगाव शहर : 1, खामगाव शहर : 3, खामगाव तालुका : घाटपुरी 2, कदमापूर 1, मलकापूर शहर : 5, मलकापूर तालुका : बेलाड 1, मोताळा शहर : 2, बुलडाणा शहर : 8, बुलडाणा तालुका : सुंदरखेड 1, रायपूर 1, सागवन 1, जळगाव जामोद तालुका : वाडी 1
22 रुग्णांनी केली कोरोनावर मात
आज 22 रुग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. विविध तालुक्यातील कोविड केअर सेंटरनुसार सुटी देण्यात आलेले रुग्ण असे ः लोणार : 2, संग्रामपूर : 1, बुलडाणा : स्त्री रुग्णालय 5, अपंग विद्यालय 3, नांदुरा : 1, चिखली : 8, जळगांव जामोद : 1, मेहकर : 1.
384 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू
आजपर्यंत 113656 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 13913 कोरोनाबाधीत रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. तसेच 1094 स्वॅब नमुने कोविड चाचणीसाठी घेण्यात आले आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 14470 कोरोनाबाधित रूग्ण असून, सध्या रुग्णालयात 384 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 173 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: