बुलडाणा (घाटावर)मुख्य बातम्या

जिल्ह्यात 62 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण; एकट्या खामगावात आढळले 17 रुग्ण!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यात आज, 16 जानेवारीला 62 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण समोर आले असून, यात एकट्या खामगाव शहरातील 17 रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान, 31 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली.

प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविलेल्या व रॅपिड अँटिजेन टेस्ट किटद्वारे तपासलेल्या अहवालांपैकी एकूण 634 अहवाल प्राप्त झाले आहेत. यापैकी 572 अहवाल कोरोना निगेटिव्ह असून, 62 अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त आले आहेत. प्राप्त पॉझिटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 57 व रॅपिड अँटीजेन टेस्टमधील 5 अहवालांचा समावेश आहे. निगेटिव्ह अहवालांमध्ये प्रयोगशाळेतील 351 तर रॅपिड टेस्टमधील 221 अहवालांचा समावेश आहे.

पॉझिटिव्ह आलेले अहवाल

बुलडाणा शहर ः 5, बुलडाणा तालुका ः सागवान 5, दुधा 1, चिखली शहर : 9, चिखली तालुका : सावंगी दळवी 1, देऊळगाव राजा शहर : 4, मोताळा शहर : 3, मोताळा तालुका : बोराखेडी 1, मेहकर तालुका : बदनापूर 1, शेगाव शहर : 8, देऊळगाव राजा तालुका : सिनगाव जहागीर 3, खामगाव शहर : 17, मलकापूर शहर : 1, जळगाव जामोद शहर : 1, संग्रामपूर तालुका : अकोली 1, गोद्री 1, मूळ पत्ता पिंपळी गुरव पुणे येथील 1 अशाप्रकारे जिल्ह्यात 62 रुग्ण आढळले आहेत.

31 रुग्णांनी केली कोरोनावर मात

आज 31 रूग्णांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. विविध तालुक्यांतील कोविड केअर सेंटरनुसार सुटी देण्यात आलेले रुग्ण असे ः खामगाव : 13, बुलडाणा : अपंग विद्यालय 3, स्त्री रुग्णालय 2, मेहकर : 2, मोताळा : 6, शेगाव : 11, जळगाव जामोद : 1.

351 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू

आजपर्यंत 96706 रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. त्याचप्रमाणे आजपर्यंत 12758 कोरोनाबाधित रुग्ण कोरोना निगेटिव्ह असल्यामुळे त्यांना वैद्यकीय प्रोटोकॉलप्रमाणे सुटी देण्यात आली आहे. तसेच 631 स्वॅब नमुने कोविड चाचणीसाठी घेण्यात आले आहेत. जिल्ह्यात आज अखेर एकूण 13267 कोरोनाबाधित रुग्ण असून जिल्ह्यात सध्या रुग्णालयात 351 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आजपर्यंत 158 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली आहे.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: