बुलडाणा (घाटावर)मुख्य बातम्या

जिल्ह्याभोवती कोरोनाचा चक्रव्यूव्ह! वर्षभरात 32 हजारांवर पॉझिटिव्ह, घेतले 240 जणांचे बळी!!

बुलडाणा ( संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः 2019 च्या अखेरीस जिल्ह्यातील 25 लाखांवर रहिवाशांना कोरोनाची तोंडओळख झाली. त्याचे जिल्ह्यात आगमन होईपर्यंत मार्च मध्यावर हा दूरवरचा परिचय घट्ट होत गेला आणि मार्च 20 च्या अखेरीस जिल्ह्यातील पहिल्या बळीची नोंद झाल्यावर हा अदृश्य शत्रू किती घातक आहे याची त्यांना जाणीव झाली. नंतर मात्र कोविडने जिल्हा मुख्यालय ते संपूर्ण जिल्हाभरात हात पाय पसरवले! गत्‌ वर्षात ठाण मांडून बसलेल्या ब्रेक के बाद पुन्हा धोकादायक पुनरागमन करत आरोग्य यंत्रणा, जिल्हा प्रशासनासह जिल्हावासीयांना जेरीस आणलंय!!

23 मार्च 2020 ला बुलडाण्यात पहिल्या रुग्णाची नोंद झाली. त्यावेळी शहरासह जिल्हा वासीयांना कोविड, पॉझिटिव्ह, कंटेन्मेंट झोन, आर टीपीसीआर, रॅपिड टेस्ट, कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, जनता कर्फ्यू, लॉक डाऊन या भयावह शब्दांची व त्याच्या भीषण व्यावहारिक अर्थाची ओळख झाली. बुलडाण्यातील मिर्झानगर तेव्हा जिल्ह्यातच नव्हे विदर्भात अन्‌ राज्यातही गाजले. बुलडाण्यात मार्च 2020 मध्ये एन्ट्री करणाऱ्या कोरोनाने मे महिन्यात जळगाव जामोद, खामगाव, जून मध्ये मलकापूर, मोताळा, जुलैमध्ये शेगाव, मेहकर, चिखली, देऊळगावराजा, सिंदखेड राजा, ऑगस्ट 2020 मध्ये  लोणार, नांदुरा, असा अफलातून प्रवास करीत जिल्हा पादाक्रांत केला. दिवाळीच्या आसपास जिल्ह्यातून माघार घेण्याची बतावणी करत गनिमी काव्याने परत कमबॅक केले. 2021 मधील मार्चमध्ये त्याचा प्रकोप वाढला. आता तर तो परत फिरणारच नाही की काय अशा जिद्दीने जिल्ह्यात ठिय्या मांडून बसलाय!

हायलाईट्स…

  • 24 मार्च 2021 अखेर
  • कोरोना पॉझिटिव्ह 32329,
  • सुट्टी मिळाली 26,034
  • मृत्यू 240
  • सध्या उपचार सुरू 6055,
  • स्वॅब नमुने 2,35, 332
  • पॉझिटिव्हीटी रेट 13.73 टक्के
  • मृत्यू दर 0.74 टक्के
  • बरे होण्याचा दर 80.52 टक्के

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: