बुलडाणा (घाटावर)मुख्य बातम्या

जि.प. उपाध्यक्षा कमलताई बुधवत यांनी सीएम फंडात वर्षभराचे मानधन; दीड लाखाचा धनादेश जिल्हाधिकाऱ्यांना सुपूर्द

बुलडाणा (विशेष प्रतिनिधी ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा सौ. कमलताई जालिंदर बुधवत यांनी मुख्यमंत्री सहायता निधीत आपल्या एका वर्षाच्या मानधनाचे योगदान दिले आहे. जिल्हाधिकारी यांना त्यांनी या रकमेचा धनादेश दिला.

कोरोनाविरुद्धच्या लढ्याने आता निर्णायक वळण घेतले आहे. शासन, प्रशासन आपल्यापरीने लढा देत आहे. मात्र हा लढा देताना शासकीय तिजोरीवर भार पडत आहे. ही बाब लक्षात घेऊन व सामाजिक बांधिलकी जोपासून जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा तथा शिवसेना जिल्हा प्रमुख जालिंदर बुधवत यांच्या अर्धांगिनी सौ. कमलताई बुधवत यांनी मुख्यमंत्री सहायता निधीत आपले योगदान देण्याचा निर्णय घेतला.

आपल्या एक वर्षाच्या मानधन इतक्या रकमेचा (1 लाख 51 हजार रुपयांचा) धनादेश त्यांनी जिल्हाधिकारी एस. रामामूर्ती यांना सुपूर्द केला. यावेळी शिवसेनेचे लखन गाडेकर, पं.स. उपसभापती श्रीकांत पवार, सदस्य दिलीप सिनकर, प्रवक्ते गजानन धांडे, अमोल शिंदे, संदीप पालकर, योग पालकर, विजय इतवारे डॉ. अरुण पोफळे, गोपाल चांदडकर हजर होते.

Related Articles

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
Close
%d bloggers like this: