क्राईम डायरीमुख्य बातम्या

जेलमधून पळालेल्‍या आरोपीला खामगावात घेतले ताब्‍यात; बुलडाणा शहर पोलिसांची कामगिरी

खामगाव (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः अल्पवयीन मुलीवर अत्‍याचार केल्याच्‍या गुन्‍ह्यातील आरोपी बुलडाण्याच्‍या ग्रामसेवक प्रशिक्षण प्रबोधिनीतील तात्‍पुरत्या कारागृहातून काल, 29 एप्रिलच्‍या पहाटे पावणेसहाच्‍या पळून गेला होता. त्‍याला काल रात्रीच खामगाव शहरातील शिवाजीनगर भागात बुलडाणा शहर पोलिसांनी अटक केली.

विनोद श्यामराव वानखेडे (रा. मांडोली, ता. बाळापूर, जि. अकोला) असे या आरोपीचे नाव आहे. त्‍याच्‍याविरुद्ध शेगाव ग्रामीण पोलिसांनी अल्‍पवयीन मुलीवर अत्‍याचाराचा गुन्‍हा दाखल केला होता. तो न्‍यायालयीन कोठडीत असताना कोरोनामुळे त्‍याला विलगीकरणात ठेवण्यात आले होते. शौचालयाचे लोखंडी गज तोडून तो फरारी झाला होता. बुलडाणा शहर पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद झाल्‍यानंतर ठाणेदार प्रदीप साळुंखे यांनी तपासचक्र फिरवत खामगाव शहरातील शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून रात्रीच त्‍याला अटक केली.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: