बुलडाणा (घाटावर)मुख्य बातम्या

झाडेगाववासीयांना जाहीर समारंभ भोवला! मुख्य अतिथीसह 155 झाले बाधित!! संपूर्ण गाव झाले सील, छावणीचे रूप, टीम डीएचओ इन ॲक्‍शन, ताफा दाखल

बुलडाणा (संजय मोहिते ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा)ः हौसेप्रमाणेच इच्छेला, श्रद्धेला मोल नसते अशी म्हण नवीन काळात तयार व रूढ झाली आहे. कमीअधिक 2200 लोकसंख्या असलेल्या जळगाव जामोद तालुक्यातील झाडेगाव वासीयांना नेमके हेच भोवले! नुसतेच भोवले नाही तर महागात पडले अन्‌ त्यांना 28 दिवसांची ‘ कैद’ देणारे अन्‌ पुढील अनेक दिवस छळणारे ठरणार आहेत.


कोरोनाचा धोका कायम असतानाच काही दिवसांपूर्वी गावात मोठा जाहीर कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी बाहेरगावच्या पुज्यनियांच्या मार्गदर्शनात पार पडलेल्या या कार्यक्रमाला तोबा गर्दी उसळली होती. अर्थात कोरोना निर्देशांची उघड पायमल्ली करण्यात आली. यामुळे तिथे प्रकटलेल्या कोरोना नामक राक्षसाने पाहता पाहता अनेक गावकऱ्यांना आपलं ‘प्रसाद’ दिला. यातून मुख्य अतिथी सुद्धा वाचले नाही. आधीचे 14 व आज निघालेले 141 असे मिळून 155 जण पॉझिटिव्ह झाले आहेत. जिल्‍हाधिकारी एस. रामामूर्ती यांनी व्‍हिडिओ कॉन्‍फरन्‍सद्वारे झाडेगावातील परिस्‍थितीचा आढावा संबंधित आरोग्‍य अधिकाऱ्यांकडून घेतला. ज्‍यांचे अहवाल निगेटिव्‍ह आले आहेत त्‍यांनाही एका शाळेत विलगीकरण कक्षात ठेवले असल्याचे तालुका आरोग्‍य अधिकारी उज्‍ज्‍वला पाटील यांनी बुलडाणा लाइव्‍हशी बोलताना सांगितले.

…आणि टीम डीएचओ!
दरम्यान, उद्रेकाची माहिती मिळताच जिल्हा आरोग्य अधिकारी बाळकृष्ण कांबळे यांच्या मार्गदर्शनात आरोग्य अधिकारी व सक्रिय झाले. गावात कॅम्प लावून स्वॅब नमुने घेण्यात आले. तसेच घराघरात सर्वेक्षण करण्यात आले. वेळीच या उपाय योजना झाल्या नसत्या तर कहर झाला असता, अशी प्रतिक्रिया प्रशांत तायडे यांच्‍यासह गावकऱ्यांनी दिली. दुसरीकडे डीएचओ डॉ. कांबळे यांनी आज पुन्हा गावाला भेट देऊन पाहणी करीत प्रतिबंधक उपाय योजनांचा आढावा घेतला. संपूर्ण गाव कंटेन्मेंट झोन घोषित करण्यात आले असून बॅरिकेट्स लावण्यात आल्याचे त्यांनी बुलडाणा लाईव्हसोबत बोलताना त्‍यांनी सांगितले. सर्वांचे नमुने घेण्यात येत असून28 दिवस गावकऱ्यांना बाहेर जाण्यास मनाई असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: