क्राईम डायरी

झुडूपाखाली ते आढळले मृतावस्थेत!; नांदुरा तालुक्यातील घटना

नांदुरा (प्रविण तायडे : बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) : नांदुरा येथून जवळ असलेल्या जुन्या निमगाव रस्त्यावर झुडूपाखाली ८० वर्षीय वृद्धाचा मृतदेह आढळल्याची घटना १० जानेवारीच्या संध्याकाळी ६ वाजेदरम्यान समोर आली.

याबाबत माहिती मिळताच नांदुरा पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक सिद्धेश्वर उमाळे, पो. काँ. श्याम आघाव घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवला. मृतकाच्या नातेवाईकांनी रुग्णालयात घेऊन ओळख पटवली. शालीग्राम पंडितराव वाकोडे (८०, रा. डॉ. बाबासाहेब आंबेडकरनगर वॉर्ड क्र.१४) असल्याचे सांगितले. अधिक तपास पोकाँ अतुल मोहाळे करत आहेत.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: