क्राईम डायरीमुख्य बातम्या

ट्रिपल सीट जाणारे दुचाकीस्वार जेसीबीला धडकले!; दोन तरुण ठार, एक गंभीर, फोटोशूट ठरले शेवटचे

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः ट्रिपल सीट भरधाव निघालेले तीन दुचाकीस्वार जेसीबीला धडकले. यात दोन तरुणांचा मृत्‍यू तर एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. हे तिघेही फोटोशूट करून परतत होते. ही घटना आज, २० जुलैला सायंकाळी सहाच्‍या सुमारास चिखली येथील देऊळगाव राजा रोडवरील रेणुका पेट्रोलपंपाजवळ घडली.

शेख दानिश शेख बिबन ऊर्फ मोनू (१८, रा. माळीपुरा चिखली) व फिरोज खान सलीम खान (१७) अशी मृतकांची नावे आहेत. सातगाव भुसारी (ता. चिखली) येथील रोहित प्रदीप कंकाळ (१९) गंभीर जखमी आहे. हे तिघे जण पल्सर मोटारसायकलने (क्र. एमएच २० सीएफ ०९९३) चिखली एमआयडीसी भागात फोटोशूटसाठी गेले होते.

चिखलीकडे परत येताना चिखली- देऊळगावराजा महामार्गावरीवरील रेणुका पेट्रोलपंपासमोर रस्ता ओलांडणाऱ्या जेसीबीला (क्र. एमएच २८ एझेड ५३७५) दुचाकीची धडक बसली. यात शेख दानिशचा जागीच मृत्यू झाला, तर याच भागातील रहिवासी फिरोज खान गंभीर जखमी झाला असल्याने त्यास उपचारार्थ औरंगाबाद येथे हलविण्यात येत होते. मात्र जालन्याजवळच त्‍याचा मृत्‍यू झाला.. रोहितवर चिखलीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघाताची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. रात्री उशिरापर्यंत चिखली पोलिसांत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

Related Articles

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
Close
%d bloggers like this: