बुलडाणा (घाटावर)

डीएलएड प्रथम वर्षाच्या प्रवेशासाठी विशेष फेरी

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः शैक्षणिक वर्ष 2021 करिता प्राथमिक पदविका डी.एल.एड प्रथम वर्षाच्या शासकीय कोट्यातील ऑनलाईन प्रवेशाच्या एकूण तीन फेर्‍या घेण्यात आल्या. तथापि अद्याप शासकीय कोट्यातील जागा रिक्त असल्याने त्या विशेष फेरीद्वारे ऑनलाइन पध्दतीने भरण्यात येतील. प्रथम येणार्‍यास प्रथम प्राधान्य पध्दतीने प्रवेश होईल. यासाठी विद्यार्थी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे यांच्या संकेतस्थळ www.maa.ac.in वर ऑनलाइन अर्ज करू शकतात. या बाबत सविस्तर सूचना प्रवेश नियमावली व अध्यापक विद्यालयनिहाय रिक्त जागा राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांच्या संकेस्थळावर उपलब्ध आहे.

प्रवेशाची शैक्षणिक पात्रता 12 वी उत्तीर्ण (खुला संवर्ग 49.5 टक्के खुला संवर्ग वगळून इतर संवर्ग 44.5 टक्के गुणांसह), प्रवेश अर्ज शुल्क (ऑनलाइन भरणे) खुला संवर्ग 200 रुपये, खुला संवर्ग वगळून इतर संवर्ग 100 रुपये राहील. विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरण्याचा दिनांक 11 ते 14 जानेवारी 2021 आहे. प्रमाणपत्राची ऑनलाइन पडताळणी 15 जानेवारीपर्यंत राहील. विद्यार्थ्यांनी स्वत:च्या लॉगिनमधून प्रवेश घ्यावयाचे अध्यापक विद्यालय निश्‍चित करुन स्वत:चे प्रवेशपत्र काढून घेण्याची मुदत 11 ते 16 जानेवारी राहील. प्राचार्य संबंधित अध्यापक विद्यालय यांनी प्रवेशिका विद्यार्थ्यांच्या प्रमाणपत्राची पडताळणी करून स्वत:चे लॉगिन मधून विद्यार्थ्यांनी ऑनलाईन सादर करण्याची मुदत 11 ते 20 जानेवारी 2021 राहील. यापूर्वी ज्यांनी अर्ज पूर्ण भरून अप्रोव्ह करून घेतला आहे. परंतु प्रवेश घेतलेला नाही असे विद्यार्थी प्रवेश घेऊ शकतात. ज्यांचा अर्ज अपूर्ण किंवा दुरुस्तीमध्ये आहे. तसेच नव्याने प्रवेश अर्ज भरुन प्रवेश घेण्यास इच्छूक असलेले असे सर्व उमेदवार अर्ज भरू शकतात. अर्ज ऑनलाईन केल्याशिवाय उमेदवाराचा प्रवेश प्रक्रियेत समावेश होणार नाही. या प्रक्रियेमध्ये विद्यार्थ्याने स्वत:च्या लॉगिनमधूनच प्रवेश घ्यावयाचा आहे. विद्यार्थ्याने अध्यापक विद्यालयाची स्वत: निवड करून लगेचच प्रवेशपत्र स्वत:च्या ईमेल, लॉगिनमधून प्रिंट घ्यावयाची आहे. त्यानंतर अध्यापक विद्यालयात चार दिवसांच्या आत प्रत्यक्ष उपस्थित राहून प्रवेश घ्यावयाचा आहे. तसेच प्रवेश प्रक्रियेच्या द्वितीय विशेष फेरीनंतर प्रवेशासाठी कोणत्याही परिस्थितीत मुदतवाढ देण्यात येणार नाही याची नोंद घ्यावी, असे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: