क्राईम डायरीमुख्य बातम्या

डॉक्‍टर दवाखान्यातून घरी परतलेच नाहीत!; नर्सिंगची विद्यार्थिनीही बेपत्ता!

बुलडाणा (बुलडाणा लाइव्ह वृत्तसेवा) ः गेल्या सहा महिन्यांत बेपत्ता झालेल्यांपैकी अवघे अर्धेच परत आणण्यात पोलिसांना यश आले. बाकीच्‍यांचा अद्याप पत्ता लागलेला नसताना दुसरीकडे मात्र बेपत्ता होण्याचे सत्र सुरूच आहे. जिल्ह्यात गेल्या ३ दिवसांत ९ जण बेपत्ता झाले आहेत. यात तीन विवाहिता, तीन तरुणी, एक मनोरुग्ण, एक ६० वर्षीय वृद्ध महिला आणि एका ४० वर्षीय प्रतिष्ठीत डॉक्टरांचा समावेश आहे. जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये याप्रकरणी मिसिंगच्या तक्रारी दाखल झाल्या आहेत.

४० वर्षीय प्रतिष्ठीत डॉक्टर बेपत्ता
डॉ. दीपक मोतीराम एकडे (४०, रा. सुंदरखेड) यांचा भादोला (ता. बुलडाणा) येथे दवाखाना आहे. सुंदरखेड ते भादोला ते रोज येजा करतात. २४ एप्रिल रोजी ते दवाखान्यात भादोला येथे गेले होते. मात्र रात्री उशिरापर्यंत ते घरी आलेच नाहीत. त्यांचा फोनही बंद होता. सर्वत्र शोध घेऊनही ते मिळून न आल्याने काल रात्री उशिरा डॉ. दीपक एकडे यांचा चुलत भाऊ योगेश वसंता एकडे यांनी बुलडाणा ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली. डॉक्‍टरांची ओळख एका २३ वर्षीय नर्सिंगच्‍या विद्यार्थिनीशी झाली होती. २३ जुलैपासून ती विवाहित विद्यार्थिनीही बेपत्ता आहे. ती बुलडाण्यात शिकत होती व मूळची चिखली तालुक्‍यातील रहिवासी होती.

अन्य बेपत्ता…

  • २३ जुलै रोजी कव्हळा येथील सौ. स्वाती भागवत मोरे (२३) ही विवाहिता बेपत्ता झाली. याप्रकरणी अमडापूर पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली. अमडापूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या सेवासंकल्प प्रतिष्ठान पळसखेड सपकाळ येथील मनोरुग्ण प्रभू नरवाडे (३५)हा बेपत्ता झाला. २३ जुलै रोजीच खामगावच्‍या सुरजदेवी महिला महाविद्यालयातून सोनाली अशोक खिरडकर (२१) ही विद्यार्थिनी बेपत्ता झाली.
  • २४ जुलै रोजी गायरान सागवन परिसरात राहणारी २८ वर्षीय विवाहिता सौ. छाया विलास जाधव बेपत्ता झाली. शहर पोलीस ठाण्यात याप्रकरणी बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली. त्याच दिवशी डॉ. दीपक मोतीराम एकडे (४०) भादोला येथून बेपत्ता झाले.
  • २५ जुलै रोजी जानेफळ पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मोहना बुद्रूक येथील पायल मोहन चव्हाण (२१) ही तरुणी बेपत्ता झाली, तर अर्चना योगेश रेडकर (२७) ही विवाहिता नागझरी (ता. शेगाव) येथून बेपत्ता झाली. याप्रकरणी शेगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली. खामगाव शहरातून रुखमाबाई विष्णूपंत खडगे ही ७० वर्षीय वृद्ध महिला बेपत्ता झाली. २५ जुलैला सोनाली रमेश सुडोकार (२१) ही तरुणी टिळक मैदान, जलालपुरा खामगाव येथून बेपत्ता झाली.

Related Articles

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
Close
%d bloggers like this: