थोडक्यात जिल्हा

डॉ. खेडेकर आरोग्‍यमंत्र्यांना भेटताच कोविड केंद्रातील असुविधांची तातडीने अधिकाऱ्यांकडून पाहणी

देऊळगाव राजा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः  तालुक्यातील कोरोना उपचार केंद्रांत औषधांचा तुटवडा, प्रसाधन गृह व इतर असुविधांबाबत माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांनी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्‍याकडे तक्रार केली. विधानभवनात त्यांच्या दालनात जाऊन डॉ. खेडेकर यांनी या प्रश्नी निवेदन दिले.

आरोग्य मंत्र्यांनी तात्काळ आरोग्‍य विभागाचे उपसंचालक व जिल्हा शल्य चिकित्सकांना फोन करून औषधांचा मुबलक पुरवठा करण्याचा व उर्वरित स्टाफा त्वरित देण्याबाबत आणि तेथील असुविधांबाबत स्वत: पाहणी करण्याची सूचना केली. काल सकाळी जिल्हा शल्य चिकित्सकांनी देऊळगाव राजा येथील कोव्हिड सेंटरची पाहणी करून आढावा घेतला. समस्या दूर करण्याचे आश्वासन दिले. त्यामुळे माजी आमदार डॉ. शशिकांत खेडेकर यांनी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची आभार मानले आहेत.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: