क्राईम डायरीमुख्य बातम्या

तरुणासह तीन महिला, तरुणी बेपत्ता

बुलडाणा (बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा) ः जिल्ह्यातून महिला, तरुणी बेपत्ता होण्याचे सत्र कायम आहे. गेल्या तीन दिवसंात दोन महिला, एक तरुणी बेपत्ता झाली असून, एक तरुणही घरातून निघून गेला आहे.

चिखली येथील ग्रामीण कुटा फायनान्स भागातील रहिवासी कांताबाई बिदेसिंग मोरे ही 46 वर्षीय महिला घरातून निघून गेल्याची तक्रार काल, २४ जूनला चिखली पोलीस ठाण्यात दाखल झाली. तिच्‍या घरच्‍यांनी ही तक्रार दिली आहे. जनुना (ता. बुलडाणा) येथील सौ. रमा राजू इंगळे ही ३५ वर्षीय महिला दोन वर्षीय चिमुकल्यासह बेपत्ता झाल्‍याची तक्रार धाड पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. शिराढोण (ता. मलकापूर) येथून राहुल किसन वाघोदे (२०) हा तरुण घरातून निघून गेला आहे. त्‍याच्‍या हरवल्याची तक्रार मलकापूर ग्रामीण पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. खामगाव शहरातील नवाफैल भागातील शालिनी ईश्वर ससे ही २० वर्षीय तरुणी घरातून निघून गेली आहे. ती हरवल्याची तक्रार शिवाजीनगर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

Related Articles

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
Close
%d bloggers like this: