क्राईम डायरी

तरुणास अडवून टोळक्‍याची बेदम मारहाण!; नांदुरा शहरातील घटना

नांदुरा (प्रविण तायडे ः बुलडाणा लाइव्‍ह वृत्तसेवा)ः जुन्या वादातून दहा ते पंधरा जणांनी तरुणास मारहाण केली. ही घटना 18 मार्चच्या रात्री 9.15 च्‍या सुमारास नांदुरा शहरातील आठवडी बाजारात मच्छी मार्केटजवळ घडली .याप्रकरणी नांदुरा पोलिसांनी 16 जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

याबाबत शिवा प्रकाश कवळे (25, रा. धनगरपुरा, नांदुरा) याने पोलीस स्टेशनला दिलेल्या तक्रारीत म्‍हटले आहे, की आठवडी  बाजारातून घरी येत असताना मच्छी मार्केटजवळ राजा खान, फारूक पटेल, तहीर अहमद,सदाम खान यांच्यासह 10 ते 12 जणांनी अडवून 12 मार्चला रात्री चौकात झालेल्या भांडणाच्या कारणावरून वाद घालत शिवीगाळ करत चापट बुक्‍क्यांनी मारहाण केली. या तक्रारी वरून 16 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक श्री. घोडेस्वार करत आहेत.

 
 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button
error: बुलडाणा लाइव्हवरून मजकूर, फोटो कॉपी करण्यास सक्त मनाई आहे. असे करताना आढळल्यास लाइव्ह ग्रुप आणि सा. भालाफेककडून कायदेशीर कारवाई केली जाईल.
Close
%d bloggers like this: